Maharashtra Election 2019 ; Worked twice as many development works in five years | Maharashtra Election 2019 ; पाच वर्षात दुप्पट विकास कामे केली

Maharashtra Election 2019 ; पाच वर्षात दुप्पट विकास कामे केली

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस । भंडारा येथे प्रचारसभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पाच वर्षात सगळ्या समस्या सुटल्या असा दावा आमचा नाही, मात्र काँग्रेस - राष्ट्रवादीने पंधरा वर्षात केले नाही ते आम्ही पाच वर्षात दुप्पट करून दाखविले. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहिले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी महायुतीला साथ द्या, पुढच्या पाच वर्षात चेहरा-मोहरा बदलून दाखवू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
भंडारा येथील दसरा मैदानावर शनिवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उर्जामंत्री तथा भाजपचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, म्हाडाचे सभापती तारीक कुरैशी, नगरपरिषद उपाध्यक्ष आशू गोंडाणे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस - राष्ट्रवादीने १५ वर्षात २० हजार कोटींची कर्जमाफी दिली. आमच्या सरकारने पाचच वर्षात ५० हजार कोटींची कर्जमाफी दिली. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत कर्जमाफी सुरुच राहील असे सांगितले.
धानाला दरवर्षी बोनस देणारे युती सरकार असून यापुढेही धानाला योग्य बोनस दिला जाईल. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून पुनर्वसनासाठी भरीव निधी दिला. गोसे प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यात आली. पाच वर्षात आठ हजार हेक्टरवरून ५८ हजार हेक्टरवर सिंचन क्षमता नेली. ती लवकरच एक लाख हेक्टर करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, भंडारा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला.
प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट असून २०२१ पर्यंत एकही व्यक्ती राज्यात बेघर राहणार नाही. प्रत्येक घरात वीज, पाणी, गॅस, शौचालय सुविधा दिल्या आणि यापुढे देण्यात येतील.
शेतकºयांकडे जमीन होती, मात्र मालकी सरकारची होती. शेतकरी भोगवटदार क्रमांक दोन होते. आमच्या सरकारने कायदा करून भूमीधारी शेतकºयांना भूस्वामी केले. त्याचा फायदा शेकडो शेतकºयांना झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बचतगटांच्या माध्यमातून ४० लाख कुटुंब जोडले आहेत. यापुढे बचत गटांसोबत एक लाख कुटुंब जोडले जातील. बचत गाटांच्या महिलांना एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देऊन महिलांना सक्षम करण्यात येणार आहे.
भंडाराजिल्ह्यात मकरधोकडा येथे दीड हजार कोटी गुंतवणुकीचा इथेनॉल प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे शेतकºयांना तणसापासून पैसा मिळेल आणि दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. भंडारा शहरासोबत जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून दाखवू. त्यासाठी तुमची साथ हवी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणले.

माझ्यावर अन्याय झाला नाही - चंद्रशेखर बावनकुळे
भाजपने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भरभरुन दिले. जिल्हापरिषद सदस्य, आमदार, मंत्री, पालकमंत्री पदे दिली. पूर्व विदर्भाच्या ३२ मतदार संघाच्या प्रचाराची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही. केवळ अफवा पसरविल्या जातात. त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनुळे यांनी केले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; Worked twice as many development works in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.