Maharashtra Election 2019 : दिव्यांगासह ज्येष्ठांनी केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 05:00 AM2019-10-22T05:00:00+5:302019-10-22T05:00:25+5:30

दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नातेवाईक दिव्यांग व्यक्तीला व्हिलचेअरवर बसवून मतदान केंद्रावर आणत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानात भाग घेतला. पवनी येथील ४०३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर देवकाबाई महादेव झगडे या ९८ वर्षीय वृद्धेने मतदानाचा हक्क बजावला.

Maharashtra Election 2019 : Senior voting with the disabled | Maharashtra Election 2019 : दिव्यांगासह ज्येष्ठांनी केले मतदान

Maharashtra Election 2019 : दिव्यांगासह ज्येष्ठांनी केले मतदान

Next
ठळक मुद्देमहिलांच्या रांगा : प्रशासनातर्फे व्हीलचेअर, रॅम्प आणि वाहनांचीही व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : विधानसभा निवडणुकीत मतदानाचा उत्साह दिवसभर जिल्ह्यात दिसून आला. ग्रामीण भागात मतदानासाठी सकाळपासूनच रांगा लागल्याचे दिसत होते. यात महिलांची संख्या लक्षणीय होती. प्रशासनातर्फे दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
तुमसर, भंडारा आणि साकोली विधानसभा क्षेत्रात सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ झाला. मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. दिव्यांग मतदारांसाठी प्रशासनातर्फे विशेष व्यवस्था करण्यात आली होती. नातेवाईक दिव्यांग व्यक्तीला व्हिलचेअरवर बसवून मतदान केंद्रावर आणत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. ज्येष्ठ नागरिकांनीही मतदानात भाग घेतला. पवनी येथील ४०३ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर देवकाबाई महादेव झगडे या ९८ वर्षीय वृद्धेने मतदानाचा हक्क बजावला.
सखी आणि आदर्श मतदान केंद्र सजविण्यात आले होते. मतदान केंद्रावर सेल्फी पॉर्इंट तयार करण्यात आले होते. अनेकांनी याठिकाणी आपल्या मोबाईलने सेल्फी काढली. जिल्ह्यातील तरूण मतदारांनी मतदान केल्यानंतर आपले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यात शांततेत मतदान पार पडले.

Web Title: Maharashtra Election 2019 : Senior voting with the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.