Maharashtra Election 2019 ; 'Polling parties' departed at 3 polling stations in Achalpur | Maharashtra Election 2019 ; अचलपूरमध्ये ३०० मतदान केंद्रांवर ‘पोलिंग पार्टीज’ रवाना

Maharashtra Election 2019 ; अचलपूरमध्ये ३०० मतदान केंद्रांवर ‘पोलिंग पार्टीज’ रवाना

ठळक मुद्देआज मतदान : कल्याण मंडपमला बसस्थानकाचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : अचलपूर विधानसभा मतदारसंघातील ३०० मतदान केंद्रांवर रविवारी मतदान पथके पाठविण्यात आली. कल्याण मंडपम परिसरात या सर्व पोलिंग पार्टीज एकत्र आल्यात. तेथून त्यांना ३२ एसटी बसेस, २२ मिनीबसेस आणि ११ जीपच्या सहाय्याने त्यांच्या निर्धारित मतदान केंद्रांवर पोहचविण्यात आलेत. या दरम्यान परिसरात उभ्या एसटी बसेसमुळे या परिसराला बसस्थानकाचे स्वरूप आले होते.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून दोनशे मीटरहून अधिक अंतरावर रस्ते वाहतुकीकरिता बंद केल्याने कल्याण मंडपमपर्यंत पोहचताना पोलिंग पार्टीजना चांगलीच पायपीट करावी लागली. उपस्थित मतदान पथकातील कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी आवश्यक सूचना दिल्यात. यादरम्यान परिसरातही चोख पोलीस बंदोबस्त तैनात, तर बाहेर राखीव पोलीस दल तैनात होते.
सकाळपासूनच ढगाळ व पावसाचे वातावरण असूनही सर्वच मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष व कर्मचारी निर्धारित वेळेत कल्याण मंडपम परिसरात हजर झाले होते. या परिसरात एक मोठा वाटरप्रृफ मंडपही उभारल्या गेला होता. परिसरात मोबाईल युरिनल्सही लावण्यात आले होते. अचलपूर विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार बच्चू कडू यांच्यासह अकरा उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. त्या अनुषंगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संपूर्ण तयारी पूर्ण केली असून रविवारी रात्रीला मतदान पथके संबंधित गावांमध्ये पोहचले आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 ; 'Polling parties' departed at 3 polling stations in Achalpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.