Maharashtra Election 2019 ; A place for development in the villages by the children | Maharashtra Election 2019 ; बच्चू कडूंद्वारे गावागावांत विकासाचा जागर

Maharashtra Election 2019 ; बच्चू कडूंद्वारे गावागावांत विकासाचा जागर

ठळक मुद्दे‘डोअर टू डोअर’ संवाद : पदयात्रांना नागरिकांची उपस्थिती

चांदूर बाजार : अचलपूर मतदारसंघातून विजयाचा चौकार मारण्याकरिता अपक्ष उमेदवार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आता ‘डोअर टू डोअर’ पदयात्रेला प्रारंभ केला आहे. चांदूर बाजार शहरात सोमवारी आपल्या समर्थकांसह बच्चू कडंूनी पदयात्रा काढली.
स्थानिक पंचायत समिती चौकातील आनंद सभागृह स्थित मुख्य प्रचार कार्यालयातून शेकडो कार्यकर्त्यांसोबत पायी प्रचाराला सुरुवात झाली. ही पदयात्रा बस स्थानक मार्गे सुरू होऊन किसन चौक, जयस्तंभ चौक, नेताजी चौक, मोर्शी रोड, गूळ साथमध्ये बच्चू कडू यांनी भेटी दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासोबत हजारो समर्थक सहभागी झाले होते.
बच्चू कडू यांनी पदयात्रेदरम्यान शहरांमधील प्रत्येक दुकानात, पानटपरीवर, फळांच्या गाड्यांवर, चहाच्या दुकानांवर जाऊन लोकांशी संवाद साधला. या पदयात्रेमध्ये रस्त्यावरून जाणाऱ्या अपंगांचासुद्धा त्यांनी आशीर्वाद घेतला. पदयात्रेमध्ये नगरसेवक सचिन खुळे, नितीन कोरडे, सरदार खान, अकबर शाह, गणेश पुरोहित, रवींद्र सूर्यवंशी, इरफान शाह, मुजफ्फर हुसेन, अ. रहमान, संतोष किटुकले, नजीरभाई, मंगेश देशमुख, शरद तायडे, मुन्ना बोडे, विनोद जवंजाळ, पंकज मोहोड, भैयासाहेब काळे, मंगेश ठाकरे, गोलू ठाकूर, अक्षय देशमुख, निखिल ठाकरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Election 2019 ; A place for development in the villages by the children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.