Maharashtra Election 2019 ; One-on-one support groups for the promotion of Savale | Maharashtra Election 2019 ; सावळेंच्या प्रचारार्थ एकवटला सहकार गट

Maharashtra Election 2019 ; सावळेंच्या प्रचारार्थ एकवटला सहकार गट

ठळक मुद्देगावागावांत प्रचारसभा : दर्यापूर मतदारसंघाचा मास्टरप्लॅन तयार

लोकमत न्यूज नेटवर्क
दर्यापूर : सहकार गटाचे नेते प्राध्यापक जगनदादा हरणे व त्यांच्या सहकाऱ्यांची साथ मिळाल्यामुळे विजयाचा मार्ग प्रशस्त झाल्याचा दावा, जिजाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष तथा दर्यापूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सीमा सावळे यांनी केला. प्रचार पदयात्रेत नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दर्यापूर तालुक्यात विकासाचा अनुशेष दूर करण्यासाठी मास्टरप्लॅन तयार केल्याची ग्वाही सीमा सावळे यांनी दिली.
सीमा सावळे यांच्या प्रचार यात्रा सध्या दर्यापूर मतदारसंघातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात सुरू आहे. यादरम्यान तालुक्यातील मूलभूत समस्यादेखील सुटल्या नसल्याचा आरोप त्यांनी केला. या मतदारसंघात आता आम्ही विकास करून दाखवू, अशी ग्वाही त्यांनी प्रचार अभियानात दिली. तालुक्याच्या राजकारणात सहकार गटाचे वर्चस्व आहे. यामध्ये अंजनगाव सुर्जी बाजार समिती, गावागावांतील काही सेवा सहकारी सोसायटी व ग्रामपंचायतीत बहुमत असणाऱ्या या गटाचे नेते जगनदादा हरणे त्यांनी सीमा सावळे यांची भेट घेऊन सहकार गटाची साथ मिळेल, असे आश्वासन देऊन प्रचारात सहभागी झाले आहेत, अशी माहिती सावळे यांनी दिली. त्यांनी गावोगावी आपला प्रचाराचा दौरासुद्धा सुरू केला. त्यांच्यासोबत सहकार गटाचे अनेक दिग्गज सावळेंच्या प्रचारात उतरल्याचा दावा त्यांनी केला. दर्यापूर तालुक्यातील समस्यांबाबत नागरिकांनी सीमा सावळे यांची भेट घेतली. याविषयी पाठपुरावा करण्याचे अभिवचन त्यांनी दिले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; One-on-one support groups for the promotion of Savale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.