Maharashtra Election 2019 : Closed by access to polling stations at 6 Pm | Maharashtra Election 2019 : ६ वाजता मतदान केंद्रांची प्रवेशद्वारे बंद

Maharashtra Election 2019 : ६ वाजता मतदान केंद्रांची प्रवेशद्वारे बंद

ठळक मुद्देनिवडणूक विभागाची कार्यवाही : मतदानासाठी रांगेत लागलेल्यांना प्रवेश

अमरावती : जिल्ह्यात आठ मतदारसंघांसाठी सोमवारी घेण्यात आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेदरम्यान सायंकाळी ६ वाजताच मतदान केंद्रांचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले. मात्र, केंद्रावर सायंकाळी ६ वाजता रांगेत लागलेल्या मतदारांना ग्राह्य धरण्यात आले.
अमरावती, बडनेरा, धामणगाव, अचलपूर, मोर्शी, मेळघाट, दर्यापूर व तिवसा या आठही विधानसभा मतदारसंघांत एकूण १०९ उमेदवारांचे भाग्य सोमवारी ईव्हीएममध्ये सील झाले. आता २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. सर्वच मतदारसंघांत सकाळी ७ ते ११ वाजेदरम्यान मतदान फारच धिम्या गतीने चालले. काही केंद्रावर शुकशुकाट बघावयास मिळाला. मात्र, दुपारी ३ वाजेनंतर मतदान केंद्रांवर मतदानासाठी एकच गर्दी झाली. ही गर्दी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहिली. मात्र, अखेरच्या तासभरात ६ वाजता मतदान केंद्रावर चिक्कार गर्दी झाली. यात दिवसभर मतदान प्रक्रियेत सहभागी असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांचा समावेश होता. काहींनी मतदान करण्यासाठी धावपळ करीत केंद्र गाठले. परंतु, मुस्लिमबहुल भागातील अनेक मतदारांना सायंकाळी ६ वाजेनंतर रांगेत लागता आले नाही. त्यामुळे अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

व्होटर स्लिप मतदारांपर्यंत पोहोचल्याच नाही
आठही मतदारसंघांत अनेक मतदारांच्या घरांपर्यंत व्होटर स्लिप पोहोचल्याच नाहीत, अशा तक्रारी सोमवारी मतदानासाठी आलेल्या मतदारांनी निवडणूक विभागाकडे नोंदविल्या आहेत. ही जबाबदारी प्रशासनाची होती. लोकसभा निवडणुकीत मतदान केले; मात्र, विधानसभा निवडणूक यादीतून बाद झाल्याचे गाºहाणी मांडण्यात आले. अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले.

Web Title: Maharashtra Election 2019 : Closed by access to polling stations at 6 Pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.