पारनेरमध्ये कार्यकर्ता ठरला लय भारी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 02:51 PM2019-10-25T14:51:11+5:302019-10-25T14:52:11+5:30

मतदारांबरोबरच थेट संपर्क, युवकांचा मोठा सहभाग, मुंबईकरांचे वाढलेले मतदान, उदय शेळके, प्रशांत गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीची एकजूट, सभापती राहुल झावरे यांनी दिलेली साथ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांचा ६० हजार ९२८ मतांनी पराभव करत त्यांचा विजयी चौकार रोखला. लंके यांनी औटींचा पराभव करत पारनेर हा शिवसेनेचा गड उद्ध्वस्त केला. जनतेने औटी, काशिनाथ दाते, सुजित झावरे यांची मतलबी युती नाकारल्याचे दिसून येते.

The rhythm of activist in Parner is heavy ... | पारनेरमध्ये कार्यकर्ता ठरला लय भारी....

पारनेरमध्ये कार्यकर्ता ठरला लय भारी....

googlenewsNext

पारनेर विधानसभा विश्लेषण-विनोद गोळे । 
पारनेर : मतदारांबरोबरच थेट संपर्क, युवकांचा मोठा सहभाग, मुंबईकरांचे वाढलेले मतदान, उदय शेळके, प्रशांत गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीची एकजूट, सभापती राहुल झावरे यांनी दिलेली साथ आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावर दाखवलेला विश्वास यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांनी शिवसेनेचे उमेदवार विजय औटी यांचा ६० हजार ९२८ मतांनी पराभव करत त्यांचा विजयी चौकार रोखला. लंके यांनी औटींचा पराभव करत पारनेर हा शिवसेनेचा गड उद्ध्वस्त केला. जनतेने औटी, काशिनाथ दाते, सुजित झावरे यांची मतलबी युती नाकारल्याचे दिसून येते.
पारनेर विधानसभा मतदारसंघात औटी व लंके यांच्यातच दुरंगी लढत झाली. लंके यांच्यासारखा सामान्य कार्यकर्ता आपणाला काय पराभूत करणार? या भ्रमात औटी होते. संदेश कार्ले व शिवसैनिकांनी अगोदर औटी यांच्याविरोधात बंडाचा झेंडा उगारला होता. पण, कार्ले यांनी तलवार म्यान केली. मात्र, या सर्व जुळवाजुळवीनंतरही औटी पराभूत झाले. औटी यांना सलग तीन निवडणुकीमध्ये साथ देणारे कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार नंदकुमार झावरे, त्यांचे पुत्र पंचायत समिती सभापती राहुल झावरे हेही यावेळी दुरावले होते. ऐन मतदानाच्या दिवशी सचिन वराळ व विखे गटाने औटी यांची साथ सोडल्याचीही चर्चा आहे. लंके यांना रोखण्यासाठी सुजित झावरे यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, जनता लंके यांच्यासोबत होती हे निकालानंतर स्पष्ट झाले. औटी पराभूत होऊ शकत नाही हा समज त्यांनी खोटा ठरविला. 
औटी हे कार्यकर्त्यांना व लोकांना चांगली वागणूक देत नाहीत, पंधरा वर्षे सत्ता दिली, आता मला संधी, द्या असा प्रचार निलेश लंके यांनी पारनेरसह नगर तालुक्यातील गावांमध्ये केला. गेल्या दीड वर्षापासून प्रत्यक्ष प्रत्येक मतदारापर्यंत संपर्क केला. महिलांची मोहटादेवी यात्रा व तरुणांची वैष्णोदेवी यात्रा, मुंबईतील पारनेरकरांचे मेळावे या उपक्रमामध्ये माणसे थेट जोडण्यात लंके यशस्वी झाले. या जोडलेल्या माणसांनी लंके यांची निवडणूक हातात घेतली व त्यांना विजयही मिळवून दिला.
राहुल झावरे, प्रशांत गायकवाड किंगमेकर
ऐन निवडणुकीत राहुल झावरे यांनी औटी यांची साथ सोडून लंके यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिला. यामुळे राजकीय समीकरणे बदलली. बांधावर असणारे राष्ट्रवादीचे काही नेते राष्ट्रवादीत स्थिरावले. तीच भूमिका निर्णायक ठरली. झावरे किंगमेकर ठरले. दुसरीकडे बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड, उदय शेळके यांनी मधुकर उचाळे, अशोक सावंत, विक्रमसिंह कळमकर, दीपक पवार, बाबाजी तरटे, प्रभाकर कवाद, नगर तालुक्यातील माजी खासदार दादा पाटील शेळके, प्रताप शेळके, माधव लामखडे, संपत म्हस्के व इतरांना एकत्र ठेवले. ही एकजूट लंके यांना विजयापर्यंत आणण्यासाठी महत्त्वाची ठरली.

Web Title: The rhythm of activist in Parner is heavy ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.