Akole Constituency Election Results: NCP's Dr. Kiran Lahmte leads | अकोले मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे आघाडीवर 
अकोले मतदारसंघ निवडणूक निकाल : राष्ट्रवादीचे डॉ. किरण लहामटे आघाडीवर 

अकोले : अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. किरण लहामटे पहिल्या फेरीनंतर १ हजार २८५  मतांनी आघाडीवर आहेत. भाजपचे वैभव पिचड पिछाडीवर आहेत.
गुरुवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीअखेर माजी आमदार वैभव पिचड २ हजार ९७२ तर डॉ. किरण लहामटे  ४  हजार २५२ मते पडली आहेत. आमदार वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. 
२०१४ च्या निवडणुकीत वैभव पिचड पहिल्यांदा राष्ट्रवादीकडून आमदार तत्पुर्वी वडील माजी मंत्री मधुकर पिचड सातवेळा या मतदारसंघातून आमदार झाले होते. मधुकर पिचड चार वेळा काँग्रेसकडून तर तीन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार झाले होते. 

Web Title: Akole Constituency Election Results: NCP's Dr. Kiran Lahmte leads

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.