Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update; राज्यात अजून किती दिवस उष्णतेची लाट?

Maharashtra Weather Update; राज्यात अजून किती दिवस उष्णतेची लाट?

Weather Update; How many more days of heat wave? | Maharashtra Weather Update; राज्यात अजून किती दिवस उष्णतेची लाट?

Maharashtra Weather Update; राज्यात अजून किती दिवस उष्णतेची लाट?

राज्यामध्ये पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सोलापूरसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३ आणि ४ मे रोजी काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

राज्यामध्ये पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सोलापूरसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३ आणि ४ मे रोजी काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.

राज्यात काही ठिकाणी किमान तापमानात किमानतापमानात मोठी घट झाल्याचे पाहायला मिळाले. हा बदल पश्चिम थंड वाऱ्यामुळे झाल्याचे हवामानशास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी यांनी 'लोकमत'ला सांगितले.

राजस्थान-गुजरातहून उष्ण वारे वाहत असल्याने पुण्यात व महाराष्ट्रात उकाडा अधिक जाणवत आहे. त्यामुळे किमान आणि कमाल दोन्ही तापमानात वाढ अनुभवायला मिळाली. कमाल तापमान चाळीशीपार जात आहे. तर किमान तापमान तिशीपर्यंत पोचले आहे.

राज्यामध्ये पुढील चार दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. सोलापूरसह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ३ आणि ४ मे रोजी काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे, तर ४ आणि ५ मे रोजी विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटा येतील, असा अंदाज आहे. गुरुवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक कमाल तापमान ४३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

नेमका बदल कशामुळे?
उत्तर भारतात किमान तापमान १० ते १४ अंशांवर आहे. त्यामुळे तिकडून थंड वारे वाहत आहेत. पश्चिम विक्षोप म्हणजे उत्तरेकडून येणारा थंड हवेचा झंझावात सक्रिय असून, हा थंड हवेचा प्रवाह अरबी समुद्रावरून वाटचाल करीत पश्चिम घाटावरून पुण्याकडे येत आहे. त्यामुळे बुधवारी रात्रीपासून गुरुवार सकाळपर्यंत थंड वाऱ्याने पुणेकरांना दिलासा मिळाला. हे वारे आपल्या सोबत अरबी समुद्रातील बाष्प वाहून आणत आहेत. दुपारी मात्र उकाडा जाणवेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

अधिक वाचा: Konkan Farming कोकणातील उन्हाळी शेतीचे गतवैभव परत येईल का?

Web Title: Weather Update; How many more days of heat wave?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.