खरिपाचे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची आशा आता रब्बी हंगामावर आहे. दरम्यान परभणी जिल्ह्यातील हजारो हेक्टर क्षेत्र करपरा कालव्यामुळे सिंचनाखाली येत असल्याने तसेच सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता असल्याने पाणी सोडण्याची मागणी होत आहे. या मागणीची दखल घेत पाटबंधारे विभागाने पुढील तीन ते चार दिवसांत पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळणार आहे.रब्बी हंगामासाठी करपरा कालव्यातून पाणी सोडण्यासाठी वर्णा गावचे सरपंच नंदकुमार आंबोरे यांनी पाटबंधारे विभागाची अधीक्षक अभियंता यांना भेटून पाणी सोडण्याबाबत मागणी केली.
या मागणीची दखल घेत दोन-तीन दिवसांत पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागांनी सरपंचांना लेखी देण्यात आली. तसेच सध्या करपरा कालव्याच्या दुरुस्तीची काम सुरू असून, दोन ते चार दिवसांत शेतकऱ्यांना पाणी मिळेल शेतकऱ्यांना पाणी लवकर मिळेल सुरळीत पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी पाणीपट्टी कर तत्काळ पाटबंधारे विभागाकडे भरणे करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
