मध्य प्रदेशातील सीमेवरील संजय सरोवरातील जलपातळी वाढत आहे. त्यामुळे बुधवारी (दि. १६) सकाळी ८ वाजता या प्रकल्पाचे ३ दरवाजे सुरू करण्यात आले असून ५८०.३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
परिणामतः भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून संभाव्य पुरावर नियंत्रण ठेवण्यासाठी, गोसीखुर्द प्रकल्पाचे ५ दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहेत. येथून ७२६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय सरोवरची पाण्याची पातळी ३०५.८२ दशलक्ष घनमीटर (७४.५९ टक्के) वाढल्याचे लक्षात आल्यावर, भंडारा जिल्हाधिकाऱ्यांनी सिवनी (मध्यप्रदेश) च्या जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर संजय सरोवरातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या तेथील १.६ मीटरपर्यंत एक आणि १.४ मीटरपर्यंत दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत.
संजय सरोवराचे पाणी ४० तासांनी म्हणजेच गुरुवारी मध्यरात्रीनंतर भंडारापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे वैनगंगेला पुन्हा एकदा पूर येऊ शकतो, असे सांगण्यात आले. वैनगंगेत पूर परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून प्रभावी कृती आराखडा तयार करण्यात आल्याचा दावा जिल्हा आपत्ती निवारण प्रधिकरणाने केला आहे.
भंडारा जिल्ह्यात २४ तासांत १५.८ मिमी पाऊस
दरम्यान, भंडारा जिल्ह्यातील सर्व तहसीलमध्ये गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १५.८ मिमी पावसाची नोंद झाली. या कालावधीत, साकोली तालुक्यात सर्वाधिक ४६.६ मिमी पाऊस पडला. लाखनी येथे ३६.८ मिमी, भंडारा येथे २०.१ मिमी, तुमसर येथे ७.८ मिमी, पवन आणि लाखांदूर येथे अनुक्रमे ७.५ मिमी आणि मोहाडी तालुक्यात ३.१ मिमी पाऊस पडला.
नागरिकांना आवाहन
यामुळे धरणाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या वैनगंगा नदीचीपाणी पातळी देखील वाढू शकते. हे लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने किनारी भागातील लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि नदीच्या मार्गाने प्रवास न करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे धरणाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या वैनगंगा नदीची पाणी पातळीदेखील वाढू शकते. हे लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने किनारी भागातील लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.