यंदा पश्चिम विदर्भात समाधानकारक व मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या भागातील २८९ मोठे, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्प तुडुंब भरले आहेत.
सोमवार २० ऑक्टोबरपर्यंतच्या अहवालानुसार, एकूण जलसाठा ९४.४९ टक्के इतका झाला असून, २० मोठ्या व मध्यम प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील १८ प्रकल्पातून विसर्ग सुरू आहे.
१८ मध्यम प्रकल्पामध्ये अकोला जिल्ह्यातील निगुर्णा मध्यम प्रकल्पात १०० टक्के साठा असून, पूर उंची १ से.मी. विसर्ग ०.९०६ क्यूमेक होता. मोर्णा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असून, पूर उंची २ से.मी. विसर्ग ०.६८ क्यूमेक सुरू आहे. उमा प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असून पूर उंची ५ से मी विसर्ग ५.६० क्युमेक होता.
घुंगशी प्रकल्पाचे १ एक गेट १० से.मी. विसर्ग ९.३९ क्यूमेक होता. वाशिम जिल्ह्यातील अडाण प्रकल्पात १०० टक्के जलसाठा असून, २ गेट २ से.मी. विसर्ग ४.८७ क्यूमेक असून, सोनल प्रकल्पात १०० टक्के जलसाठा आहे.