उजनी धरण परिसरात पडलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणाचीपाणीपातळीत वाढ झाली असून, गेल्या दोन दिवसांत २ टीएमसीने वाढ झाली असून, उजनी धरणाची पाणीपातळी वजा १९.४३ टक्के झाली आहे.
यावर्षी वजा २२. ९६ टक्क्यापर्यत खाली गेली होती. गेल्या आठ दिवसांत १३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत मे महिन्यात पडलेला सर्वाधिक पाऊस मानला जात आहे.
यावर्षी उजनी धरणाची पाणीपातळी १४ मेपर्यंत वजा २२.९६ टक्केपर्यंत खाली गेले होती. १४ मेपासून पडत असलेल्या मान्सून पूर्वपातसामुळे १८ मेपर्यंत उजनी पाणीपातळी स्थिर राहिली होती. उजनी धरण परिसरात सलग पाच दिवसांपासून कमी जास्त प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने उजनीत पाणी साठा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
उजनी धरणाचा ५१.३६ टीएमसी पाणी साठा शिल्लक राहिला होता. त्यात २ टीएमसीने वाढ होऊन ५३.२५ टीएमसी झाला आहे. गतवर्षी पासून १४ मे पर्यंत ५८३ मिली मीटर पावसाची नोंद झाली होती. गेल्या आठ दिवसांत १३७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. एकूण ७२१ मिली मीटर पाऊस पडला आहे.
दि. १ जून ते ३१ मेपर्यंत एक वर्षाचा सरासरी पाऊस पकडला जातो. सध्या उजनी धरणातून मुख्य कालवा कमी करण्यात आला असून, ५०० कूसेक्य विसर्ग सोडण्यात येत आहे. भीमा सीना जोड कालव्यातून २०० कसेक्य विसर्ग सोडण्यात येत आहे.