Join us

Ujani Dam Water Level : उजनी धरण भरण्यास अजून किती टीएमसी पाण्याची आवश्यकता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 18:32 IST

Ujani Dam भीमा खोऱ्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने बंडगार्डनसह दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे.

गणेश पोळटेंभुर्णी : भीमा खोऱ्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने बंडगार्डनसह दौंड येथील विसर्गात वाढ झाली आहे. यामुळे उजनीतून वीज निर्मिती केंद्रातून भीमा नदीत १ हजार ६०० क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.

पावसाळा आणखी ३ महिने शिल्लक असल्याने उजनीची पाणी पातळी ९० टक्के पर्यंत गेल्यास पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी भीमा नदीत आणखी विसर्ग सोडला जाणार असल्याची माहिती उजनी धरण वरिष्ठ अभियंता रावसाहेब मोरे यांनी दिली.

सध्या उजनी पाणी पातळी ८६ टक्के झाली असून दौंड येथून १७ हजार क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. पंढरपूर आषाढी वारी लक्षात घेता, पंढरपूर येथे पूर स्थिती निर्माण होऊ नये म्हणून उजनीतून भीमा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला होता.

बुधवार, २ जुलै रोजी बंद करण्यात आला होता. मात्र भीमा खोऱ्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने भीमा खोऱ्यातील धरणे तुडुंब भरली असून २० पैकी ९ धरणांतून विसर्ग सोडण्यात येत आहे.

बंडगार्डन येथून १९ हजार ७१९ क्युसेक विसर्ग सुरू आहे. तर मुळशी धरणातून ८ हजार २०० क्युसेक विसर्ग सुरू आहे.

खडकवासला ३ हजार ८५० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे. दरम्यान, धरणात ४६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. आणखी सात टीएमसी पाणी जमा झाल्यास उजनी १०० टक्के भरणार आहे.

यंदा २३ टीएमसी, गतवर्षी १५६ टीएमसी पाणी सोडलेयावर्षी चालू हंगामात आत्तापर्यंत उजनीतून २३ टीएमसी पाणी भीमा नदीत सोडण्यात आले. गतवर्षी उजनीतून १५६ टीएमसी अतिरिक्त पाणी सोडून द्यावे लागले होते.

पाणी सोडावे लागणारपावसाला आणखी तीन साडेतीन महिने शिल्लक असल्याने उजनीतून मोठ्या प्रमाणात पाणी सोडावे लागणार आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाळा धरला जातो. उजनी धरणाची क्षमता १२३ टीएमसी असून सध्या उजनीत ११० टीएमसी पाणीसाठा झाला आहे.

अधिक वाचा: कोयना धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; लवकरच धरणाचे दरवाजे उघडणार

टॅग्स :उजनी धरणपाणीनदीधरणसोलापूरपाऊसपुणेपंढरपूरआषाढी एकादशी वारी 2025