Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Ujani Dam Water Level : दौंडमधून पाच हजारांचा विसर्ग; उजनी धरणात झाला किती पाणीसाठा?

Ujani Dam Water Level : दौंडमधून पाच हजारांचा विसर्ग; उजनी धरणात झाला किती पाणीसाठा?

Ujani Dam Water Level : Five thousand released from Daund; How much water was stored in Ujani Dam? | Ujani Dam Water Level : दौंडमधून पाच हजारांचा विसर्ग; उजनी धरणात झाला किती पाणीसाठा?

Ujani Dam Water Level : दौंडमधून पाच हजारांचा विसर्ग; उजनी धरणात झाला किती पाणीसाठा?

Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. सोमवारी दि. ३ रोजी सायंकाळी ६ वाजता २८.४२ टक्के झाली आहे.

Uajni Dam Water Level सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची पाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. सोमवारी दि. ३ रोजी सायंकाळी ६ वाजता २८.४२ टक्के झाली आहे.

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाचीपाणी पातळी संथ गतीने वाढत आहे. सोमवारी दि. ३ रोजी सायंकाळी ६ वाजता २८.४२ टक्के झाली आहे.

दौंड येथील विसर्ग कायम असून सध्या ५ हजार १०५ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत आहे. मंगळवारी सकाळी २७.८० टक्के पाणी पातळी होती.

उजनी धरणात सध्या ७८.८८ टीएमसी पाणीसाठा झाला असून, १५.२३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.

गेल्या १८ मे पासून उजनी धरणाची पाणी पातळी वाढत असून गेल्या १५ दिवसांत ५० टक्के पाणी पातळी वाढली आहे. सध्या उजनी धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी बंद आहे.

१ जून रोजी ५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने ४ जूनपासून पाणी पातळी स्थिर राहिली होती, तर ९ जूनपासून पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली होती.

गतवर्षी ४ जून २०२४ रोजी ३१.५६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता, तर धरणाची पाणी पातळी वजा ५९.९२ टक्केपर्यंत खाली गेली होती.

अधिक वाचा: एप्रिलच्या मदतीचा छदाम सुद्धा आला नाही; 'मे'ची मदत नक्की मिळणार का?

Web Title: Ujani Dam Water Level : Five thousand released from Daund; How much water was stored in Ujani Dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.