Lokmat Agro >हवामान > Ujani Dam Water Level उजनीतील विसर्ग कमी, पण पाणीसाठा वाढला

Ujani Dam Water Level उजनीतील विसर्ग कमी, पण पाणीसाठा वाढला

Ujani Dam Water Leve;l Discharge in Ujani decreased, but water storage increased | Ujani Dam Water Level उजनीतील विसर्ग कमी, पण पाणीसाठा वाढला

Ujani Dam Water Level उजनीतील विसर्ग कमी, पण पाणीसाठा वाढला

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात घट झाली असून, सोमवार, १० जून रोजी सायंकाळी सहा वाजता ५ हजार ८८३ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता.

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात घट झाली असून, सोमवार, १० जून रोजी सायंकाळी सहा वाजता ५ हजार ८८३ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता.

शेअर :

Join us
Join usNext

उजनी धरणात मिसळणाऱ्या दौंड विसर्गात घट झाली असून, सोमवार, १० जून रोजी सायंकाळी सहा वाजता ५ हजार ८८३ क्युसेक विसर्ग उजनी धरणात मिसळत होता. उजनी धरणाचीपाणी पातळी वजा ५६.७९ टक्के इतकी झाली होती.

गेल्या चार दिवसांपासून उजनी पाणलोट व भीमा खोऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे उजनी धरणाचीपाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली होती. वजा ५९.९९ टक्के इतकी खाली गेली होती. मात्र उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने उजनीची पाणी पातळी वजा ५६.७९ टक्के यावर स्थिर राहिली होती.

गेल्या दोन दिवसात पावसाने जोर धरल्यामुळे उजनीची पाणी पातळी वाढण्यास सुरुवात झाली होती. ९ जून रोजी सायंकाळी दौंड येथून ६ हजार २८६ क्यूसेक विसर्ग सुरू झाला होता. त्यात सकाळी वाढ होऊन ७ हजार ९५६ क्युसेक इतका झाला होता.

मात्र, सायंकाळी त्यात घट होऊन ५ हजार ८८३ क्युसेक इतका चालू होता. गेल्या चार दिवसात दोन टीएमसी पाणीसाठा वाढला. सध्या धरणात ३३.२४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यात आणखी वाढ होणार आहे.

अधिक वाचा: Weather Forecast मान्सूनने निम्मा महाराष्ट्र काबीज केला; आज कुठे मुसळधार? कुठे ऑरेंज अलर्ट?

Web Title: Ujani Dam Water Leve;l Discharge in Ujani decreased, but water storage increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.