Lokmat Agro >हवामान > Ujani Dam : उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी; उपयुक्त शिल्लक पाणीसाठा किती?

Ujani Dam : उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी; उपयुक्त शिल्लक पाणीसाठा किती?

Ujani Dam : The water storage of Ujani Dam is rapidly decreasing; What is the useful remaining water storage? | Ujani Dam : उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी; उपयुक्त शिल्लक पाणीसाठा किती?

Ujani Dam : उजनी धरणाचा पाणीसाठा झपाट्याने होतोय कमी; उपयुक्त शिल्लक पाणीसाठा किती?

उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सिंचनाबरोबर पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने उजनी धरणातून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे.

उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सिंचनाबरोबर पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने उजनी धरणातून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पळसदेव : उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी सिंचनाबरोबर पिण्यासाठी पाण्याचे आवर्तन सुरू असल्याने उजनी धरणातून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे.

सध्या उजनी धरणातीलपाणीसाठा २० टक्क्यांवर आला असून धरणात ११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे पिकाला पाणी देण्याची वेळ येत आहे. त्यामुळे पिकाची तहान भागवण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे.

सध्या उजनी धरणातून २,९५० क्युसेकने कॅनॉलमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यासोबत इतर पाणी योजना, बाष्पीभवन यामुळे उजनीतून झपाट्याने पाणीसाठा कमी होत आहे.

धरणातून पाणीसाठा कमी झाल्याने पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी पाइप वाढवून पिकाला पाणी देण्यासाठी धडपड करत आहे.

सध्या पाणीसाठा अधिकच खालावल्याने आता पाणी देताना चारीचा आधार घेण्याची वेळ बळीराजावर आली आहे. दरवर्षी धरणग्रस्त शेतकऱ्याच्या नशिबातच पाण्यासाठी संघर्ष लिहिला असल्याचं मत अरविंद जगताप यांनी व्यक्त केला.

११ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक
धरणातून पाणीसाठा कमी झाल्याने पिकाला पाणी देण्यासाठी शेतकरी पाइप वाढवून पिकाला पाणी देण्यासाठी धडपड करत आहे.

लाखो रुपये खर्च करण्याची शेतकऱ्यांवर वेळ
१) उजनी काठावरील धरणग्रस्त शेतकरी संघटित नसल्यामुळे राजकीय नेते मंडळी याचा फायदा घेऊन केवळ माताच राजकारण करून या भागातील शेतकऱ्यांचा मातापुरता वापर करून घेतात. 
२) मात्र धरणग्रस्तांच्या हक्काच्या पाण्यासाठी ठोस काम करत नाहीत. हेच परिस्थिती गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी पाइप, केबल व चाऱ्या काढण्यासाठी शेतकऱ्याला लाखो रुपये खर्च करण्याची वेळ येत आहे.
३) मूळ सिंचन आराखड्यात राखीव पाण्याची तरतूद आली तरी या भागातील शेतकरी पाण्याची मागणी करत नाहीत पाणीपट्टी भरण्यास कमी पडत असल्यानं उजनी धरणग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पाणी आजपर्यंत राखीव ठेवता आले नाही. 

२० जुलै २०१९ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व धरणातील पाण्याच्या वापराबाबत प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. त्यानुसार प्रथम पशुधन, पिण्यासाठी, आरोग्य व घरगुती वापरासाठी प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. त्यानंतर कृषी (सिंचनाकरिता वापर) नंतर औद्योगिक वापर, पर्यावरण, करमणूक व नंतर इतर वापर या पद्धतीने पाण्याच्या वापराचा प्राधान्यक्रम ठरवण्यात आला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यातील नागरिकांना पाईपलाइन पूर्ण होईपर्यंत पिण्यासाठी पाणी द्यावे लागत आहे. - रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता

 अधिक वाचा: Rain Water Harvesting : शेतकऱ्यांनो रेन वॉटर हार्वेस्टिंग करा; होतील हे पाच फायदे

Web Title: Ujani Dam : The water storage of Ujani Dam is rapidly decreasing; What is the useful remaining water storage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.