Lokmat Agro >हवामान > यंदा जुलैमध्येच धरणांत पाणीच पाणी; कोल्हापूर जिल्ह्यातील १७ धरणे ओव्हरफ्लो

यंदा जुलैमध्येच धरणांत पाणीच पाणी; कोल्हापूर जिल्ह्यातील १७ धरणे ओव्हरफ्लो

This year, there is only water in the dams in July itself; 17 dams in Kolhapur district overflowed | यंदा जुलैमध्येच धरणांत पाणीच पाणी; कोल्हापूर जिल्ह्यातील १७ धरणे ओव्हरफ्लो

यंदा जुलैमध्येच धरणांत पाणीच पाणी; कोल्हापूर जिल्ह्यातील १७ धरणे ओव्हरफ्लो

गेले अडीच महिने जिल्ह्यात अखंडितपणे पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असला, तरी सातत्य राहिल्याने धरणे तुडूंब झाली आहेत.

गेले अडीच महिने जिल्ह्यात अखंडितपणे पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असला, तरी सातत्य राहिल्याने धरणे तुडूंब झाली आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : गेले अडीच महिने जिल्ह्यात अखंडितपणे पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमी असला, तरी सातत्य राहिल्याने धरणे तुडूंब झाली आहेत. जिल्ह्यातील १७ धरणे पूर्णक्षमतेने भरून वाहत असल्याने कोल्हापूरकरांची उन्हाळ्याची चिंता मिटली आहे.

जिल्ह्यात छोटी-मोठी १७ धरणे आहेत. सर्वाधिक ३४ टीएमसी क्षमतेचे वारणा धरण आहे. हे धरण सांगली जिल्ह्यात येत असले, तरी त्याचा थेट परिणाम कोल्हापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांवर होतो.

पाठोपाठ २५ टीएमसी क्षमतेचे दूधगंगा धरण आहे. राधानगरी धरण ८ टीएमसीचे असले, तरी कोल्हापूर शहरासह करवीर, राधानगरीसह काही तालुक्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ही तिन्ही धरणे कधी भरणार याकडे नजरा लागलेल्या असतात.

यंदा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पाऊस बरसायला सुरुवात झाली. मध्यंतरीचा काही कालावधी वगळता जिल्ह्यात एकसारखा पाऊस सुरू आहे. त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्यातच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

जिल्ह्यातील १७ धरणांमध्ये ९३.६६ टीएमसी पाणीसाठा आहे. वर्षभर त्याचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास जूनपर्यंत पिण्यासह शेतीसाठी पाणी मुबलक मिळते.

यंदा, 'धामणी'चा फायदा
गेली ३० वर्षे राधानगरी, पन्हाळा व गगनबावडा तालुक्यांतील शेतकऱ्यांचे स्वप्न असलेल्या राई (ता. राधानगरी) येथील धामणी प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठविले आहे. हे पाणीही यंदा अतिरिक्त म्हणून शेतकऱ्यांसह पिण्यासाठी वापरण्यास मिळणार आहे.

तुलनेत धरणक्षेत्रात कमीच पाऊस
सलग पाऊस असला तरी अतिवृष्टी-सारखा कोसळलेला नाही. त्यामुळे धरणक्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस कमीच राहिला आहे.

दोन महिने कसे जाणार?
मान्सूनच्या पहिल्या दोन महिन्यांतच धरणे तुडूंब झाली आहेत. अजून निम्मा पावसाळा आहे. या कालावधीतही जोरदार पाऊस होईल, असा अंदाज असल्याने हे दोन महिने कोल्हापूरकरांसाठी धाकधूक वाढविणारी आहेत.

वर्षात जुलैअखेर झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये
धरण - २०२३ - २०२४ - २०२५
राधानगरी - २८४८ - ४११३ - ३०३९
तुळशी - २१४२ - ३६९३ - २५८२
वारणा - १३०५ - २८२३ - २०५९
दूधगंगा - १७७८ - २९९६ - २८९९
कासारी - ३१८४ - ३६९९ - ३००४
कडवी - २५८१ - ३०५९ - २२८०
कुंभी - ३५०५ - ३७४६ - ३१५३
पाटगाव - ५२१६ - ५९३४ - ४२८४
चिकोत्री - १६६० - २४४२ - १६६०
घटप्रभा - ४५०६ - ५८०४ - ४६८६
आंबेओहोळ - १११४ - १८५५ - ८३६

अधिक वाचा: E Pik Pahani : ई-पीक पाहणी करताना किती अंतरावरून घ्यावा लागणार पिकांचा फोटो?

Web Title: This year, there is only water in the dams in July itself; 17 dams in Kolhapur district overflowed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.