Join us

जुलैच्या सुरुवातीलाच भरली राज्यातील 'ही' धरणे; मराठवाडा-विदर्भ मात्र अध्यापही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 20:17 IST

Dam Water Storage : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश भागांतील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक धरणे भरावाच्या उंबरठ्यावर आली आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश भागांतील धरण साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक धरणे भरावाच्या उंबरठ्यावर आली आहेत.

मात्र नागपूर विभाग तसेच मराठवाड्यात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून आढळा व भोजापूर धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तसेच सीना धरणही १०० टक्के भरले आहे. भंडारदरा ६९.९१%, निळवंडे ८२.६७% आणि मुळा ७०% इतक्या क्षमतेने भरली आहेत. दक्षिण नगरमधील येडगाव ८६.९२%, डिंभे ६८.०८% तर विसापुर ९९% भरले आहे.

तसेच नाशिक विभागातील गंगापूर ५५.२२%, दारणा ६१.१०%, पालखेड ६३.०८%, गिरणा ४८.६५% आणि हतनूर ३०.२०% भरली आहेत. पांझरा धरण १००% क्षमतेने भरले असून हा भाग समाधानकारक स्थितीत आहे. दरम्यान मुंबईसह कोकणातील धरणांमध्ये समाधानकारक साठा असून मोदक सागर १००%, तानसा ७८.७६%, भातसा ७२.१७%, तिलारी ८२.६६%, सुर्या ७६.६७% भरली आहेत. अणू व वैतरणा ८२.०५% भरली आहे.

पुणे विभागातील चासकमान ८०.२१%, पानशेत ६८.६३%, खडकवासला ५६.८२%, मुळशी ७४.३४%, पवना ७६.२३%, वीर ८२.२२% अशा साठ्यांसह जलसाठा आहे. उजनी धरण ९६.६९% भरले असून उपयुक्त साठा ९२.७९% आहे. कोयना धरणात एकूण साठा ६९.२७% असून उपयुक्त साठा ६६.७०% आहे. दोन्ही धरणांमधून विसर्गही सुरू आहे.

मराठवाड्याचे जायकवाडी धरण ७६.३३% भरले असून उपयुक्त साठा ६८.२८% आहे. मात्र माजलगाव १०.७७%, विष्णुपुरी २३.६८%, दुधना ३५.०१%, मांजरा २५.९७% अशी काही धरणे अद्याप अर्धवट स्थितीत आहेत. यामुळे मराठवाड्याला अजूनही पावसाची गरज आहे. तर विदर्भातील गोसीखुर्द ३९.७८%, तोतलाडोह ५९.५४%, उर्ध्व वर्धा ४७.१०% भरले आहेत. मात्र खडकपुर्णा केवळ ६.३४%, काटेपूर्णा २५.४४% भरले असून अध्याप मोठ्या पाण्याची गरज या परिसराला आहे. 

एकंदरीत राज्याच्या अनेक भागात समाधानकारक जलसाठा झाला असला तरी मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. येत्या काही दिवसांत जर पावसाचा जोर असाच राहिला तर उर्वरित भागातही धरण साठा समाधानकारक स्थितीत पोहोचेल अशी शक्यता आहे.

टीप : वरील सर्व आकडेवारी १० जुलै २०२५ रोजी सकाळी ६ वा. नुसार आहे. 

- इंजि. हरिश्चंद्र चकोर (सेवानिवृत्त), जलसंपदा विभाग, संगमनेर.

हेही वाचा : आता घर बसल्या एका क्लिकवर मिळवा गाव कारभाराची संपूर्ण माहिती; 'मेरी पंचायत' ॲप

टॅग्स :पाणीशेती क्षेत्रशेतकरीशेतीविदर्भजायकवाडी धरणगोदावरीगंगापूर धरणनांदूरमधमेश्वरधरणनदीउजनी धरणकोयना धरण