यंदाचा पावसाळा अक्कलकोट तालुक्यासाठी शगुन ठरत चालला आहे. दोन दिवसांपासून लाभक्षेत्रात पुन्हा मुसळधार पाऊस पडला अन् kurnur dam कुरनूर धरणाची वाटचाल शंभरीकडे सुरू झाली आहे.
आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी शुक्रवारी धरणातून दोन दरवाजांद्वारे प्रतिसेकंद १५० क्युसेक पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
८२२ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमता असलेल्या कुरनुर धरणात बुधवारी सकाळी ९५ टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात ७८१ दशलक्ष घनफूट प्रत्यक्ष पाणीसाठा झाला आहे.
लाभक्षेत्रातील पावसामुळे बोरी व हरणा नदीच्या पात्रातून प्रचंड प्रमाणात पाणीप्रवाह येऊन मिसळत आहे. हवामान विभागाकडून अजूनही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
बोरी विभागाकडून पाटबंधारे नदीकाठच्या गावांना लेखी स्वरूपात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. इतिहासात जून, जुलै महिन्यात कुरनूर धरण पूर्ण क्षमतेने ही पहिलीच सुखद वेळ आहे.
पाणी पातळीत ठेवण्याचे नियोजनदरवर्षी धरण परतीच्या पावसाने भरत होते. पण, यंदाची परिस्थिती वेगळी आहे. धरण लवकरच भरले आहे. यामुळे संबंधित विभागाने नियोजन लावले आहे.
यंदाचा पावसाळा हा जनतेसाठी जमेची बाजू आहे. धरण भरले यामुळे पुढील वर्षाची चिंता मिटली आहे. परंतु यापुढील पावसामुळे जी परिस्थिती निर्माण होईल यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी. संबंधित विभागाला खबरदारीच्या आवश्यक सूचना दिल्या आहेत.
अधिक वाचा: नवीन शेतजमीन खरेदी केल्यास 'पीएम किसान' योजनेचा लाभ घेता येतो का? काय आहे नियम?