Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर

वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर

Stormy rains cause flooding in Nalganga river, five gates of the project opened; Administration on 'alert mode' | वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर

वादळी पावसामुळे नळगंगा नदीला पूर तर प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले; प्रशासन 'अलर्ट मोड'वर

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

मलकापूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे नळगंगा प्रकल्पाचा जलसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे. परिणामी, प्रकल्पाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले.

त्यामुळे नळगंगा नदीला पूर आला असून, नदीकाठच्या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ढगाळ वातावरण कायम असन, प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बुलढाणा जिल्ह्यात १ नोव्हेंबरच्या पहाटेपासून विशेषतः घाटाखालील भागात मुसळधार पावसाची नोंद झाली. मोताळा तालुक्यात काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली, तर मलकापूर तालुक्याच्या दक्षिणेकडील भागात पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील नाले, ओढे तुडुंब भरून वाहत आहेत.

प्रशासन सज्ज; गावांत दवंडी

धरणातून पाणी सोडण्याच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार राहुल तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन अलर्ट मोड'चर आहे. मलकापूर शहर तसेच लगतच्या गावांमध्ये दवंडीच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

धरण पूर्ण क्षमतेने भरले, दरवाजे उघडण्याचा निर्णय!

नळगंगा प्रकल्पातील जलसाठा मागील काही दिवसांपासून १०० टक्क्यांपर्यंत भरलेला आहे. पहाटे घाटावरील भागात झालेल्या वादळी पावसानंतर जलस्तर झपाटधाने वाढल्याने २ नोव्हेंबर रोजी सकाळीच धरणाचे पाच दरवाजे चार इंचांनी उघडण्यात आले. त्यामुळे नळगंगा नदीत पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीकाठच्या शेतात पाणी शिरले होते.

नुकसान नाही, पण जनजीवन विस्कळीत !

दुपारपर्यंत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणतीही अनुमित घटना अध्यामोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वृत नाही. माभ, नदीकाळच्या भागात रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली असून, काही ठिकाणी पाणी घरांच्या परिसरात शिरले आहे. सायधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्याघ्र नदीला पूर; शेतशिवार जलमय !

देवधावा परिसरात शनिवारी रात्री दोन ते तीन तास पडलेल्या वादळी पावसाने देवधाबा व परिसरात पुन्हा एकदा थैमान घातले. कापूस, मका व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, व्याध नदीला आलेल्या पुरामुळे शेतशिवार जलमय झाले आहे. जणू निसर्गानच शेतमाल घरात पोहोचू देणार नाही, असा पवित्रा घेतल्याचे चित्र दिसत आहे.

वादळी पावसामुळे शेतातील भिजलेला, फुटलेला कापूस पूर्णपणे खराब झाला आहे. काही ठिकाणी मक्याचे कणीस जमिनीवर पडले असून, त्यावर कोंब फुटण्याची शक्यता वाढली आहे.

सोंगून ठेवलेल्या मक्याच्या गंजीतही ओलावा शिरल्याने कणीस कुजण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे हातात आलेले उत्पादनही वाचेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे. नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून मदतीची मागणी होत आहे.

हेही वाचा : पाणंद रस्त्यांचा मिटलेला वाद आता पुन्हा उद्भवणार नाही! स्थळ पंचनामा आणि जिओ टॅग फोटो बंधनकारक

Web Title: Stormy rains cause flooding in Nalganga river, five gates of the project opened; Administration on 'alert mode'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.