नातेपुते : नीरा खोऱ्यात पडत असलेल्या पावसामुळे ब्रिटिशकालीन भाटघर धरण ९६ टक्के भरले आहे. गतवर्षी धरण ९१ टक्के भरले होते. मागील वर्षीच्या तुलनेत धरण ५ टक्के अधिक भरले आहे.
भाटघर धरण भागात आजपर्यंत एकूण ५६६ मिलीमीटर पाऊस होऊन धरण ९६ टक्के भरले आहे. नीरा देवघर धरण भागात आजपर्यंत एकूण १४३५ मिलीमीटर पाऊस होऊन धरण ८५.७४ टक्के भरले आहे.
गुंजवणी धरण भागात आजपर्यंत १६६४ मिलिमीटर पाऊस होऊन धरण ७३.०१ टक्के भरले आहे. वीर धरण पाणलोट क्षेत्रात आजपर्यंत १७० मिमी पाऊस पडला असून वीर धरण ९०.७४ भरले आहे.
वीर धरणातून नीरा नदी पात्रात १४,१८४ क्युसेक विसर्ग होत असून भाटघर धरणातून ५०११, गुजवंणी धरणातून १६५२ विसर्ग चालू आहे.
नीरा उजवा कालव्यातून १४५२ क्युसेक तर डाव्या कालव्यातन ८२७ क्यसेक विसर्ग सुरू आहे. नीरा खोऱ्यात पावसाची संततधार सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून नीरा खोऱ्यात पाऊस पडत असून पावसामुळे डोंगरदऱ्यातून धबधब्यांसह नदी, ओढे भरून वाहत आहेत.
अधिक वाचा: e pik pahani : ई-पीक पाहणीचे मोबाईल अॅप अपडेट झाले; खरीप पीक पाहणीला सुरवात