Lokmat Agro >हवामान > Rain Water Harvesting : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? आणि त्याच्या पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर

Rain Water Harvesting : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? आणि त्याच्या पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर

Rain Water Harvesting : What is Rain Water Harvesting? and what are its methods? Read in detail | Rain Water Harvesting : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? आणि त्याच्या पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर

Rain Water Harvesting : रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? आणि त्याच्या पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर

भारतात दरवर्षी सरासरी १०० इंच पाऊस पडतो. यावर्षी पाऊस चांगला झाला असताना सुद्धा मार्च महिन्यामध्येच काही भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

भारतात दरवर्षी सरासरी १०० इंच पाऊस पडतो. यावर्षी पाऊस चांगला झाला असताना सुद्धा मार्च महिन्यामध्येच काही भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

भारतात दरवर्षी सरासरी १०० इंच पाऊस पडतो. यावर्षी पाऊस चांगला झाला असताना सुद्धा मार्च महिन्यामध्येच काही भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

आत्ताच तापमान खूप  वाढले आहे. त्यामुळे धरणातील साठा मे महिन्यापर्यंत खूप कमी होईल असा अंदाज आहे. धरणातील साठा हा शहरी भागातील पिण्याच्या पाण्यासाठी, घरगुती वापरासाठी व भागातील कारखान्यांसाठी तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी केला जातो.

शहरीकरण जास्त होत चालले असल्यामुळे शहरांची पाण्याची गरज वाढली आहे. त्यामुळे धरणांमधून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करणे अवघड होत चालले आहे.

वारंवार पडणारा दुष्काळ, पाणीटंचाई, चारा टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता पाणी काटकसरीने वापरणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पडलेल्या पावसाचे पाणी व्यवस्थित साठविणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते व्यवस्थित गोळा करणे व साठवणे यालाच वर्षा जलसंचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणतात.

रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती

१) छतावर पडणारे पावसाचे पाणी जलसंचयन

यामध्ये इमारतीच्या अगर घराच्या छतावर पडणारे पाणी गोळा केले जाते व खाली दिलेल्या घटकांचा वापर करून पाण्याची साठवणूक केली जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला प्रमुख काही घटकांची आवश्यकता असते.
- कॅचमेंट (पाणलोट) : पाणी गोळा करणे व साठविणे.
- कन्वेअन्स सिस्टीम (वाहतूक प्रणाली) : गोळा केलेले पाणी दुसऱ्या ठिकाणी रिचार्ज झोन पर्यंत वाहून नेणे.  
- फ्लॅश (पाण्याचा झोत) : सुरुवातीचे वाहून आलेले पाणी बाहेर काढणे.
- फिल्टर : गोळा केलेले पाणी गाळून त्यातील घाण काढणे.
- टाकी व रिचार्ज स्ट्रक्चर्स : गाळून ठेवलेले पाणी पुढे वापरण्यासाठी सज्ज ठेवणे.

२) भूपृष्ठभागावर पडणारे व वाहून जाणारे पाण्याचे जलसंचयन
यामध्ये आपण जमिनीवर पडणारे पाणी वाहून जाऊन न देता ते गोळा करून त्याचा वापर करतो.

रेन हार्वेस्टिंगचे फायदे
१) वर्षा जलसंचयन पावसाचे पाणी गोळा करणे व साठवणे, याचबरोबर भूजल व महानगरपालिकेचा पाणीपुरवठा या दोन्हींची मागणी कमी करते.
२) रेन हार्वेस्टिंग केलेले पाणी जे पिण्यायोग्य नाही ते टॉयलेटची साफसफाई, कार धुणे, झाडांना पाणी देणे यासाठी वापरता येते. यामुळे पाणी वापराचे बिल कमी येते.
३) पाण्याचा प्रवाह जमिनीची धूप, पूर व शहरी भागातील प्रदूषण यावर नियंत्रण.
४) रेन वॉटर हार्वेस्ट केलेल्या पाण्यामध्ये दूषित पदार्थांचे प्रमाण नसते त्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारतो.

मुकुंदराव एम. पाटील
निवृत्त कार्य पालक संचालक, आरसीएफ, मुंबई
राजेंद्र कदम
निवृत्त मुख्य प्रबंधक, आरसीएफ, पुणे
9763458276

अधिक वाचा: Namo Kisan Hapta : नमो किसानचा हप्ता जमा झाला कि नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल?

Web Title: Rain Water Harvesting : What is Rain Water Harvesting? and what are its methods? Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.