Lokmat Agro >हवामान > राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले; दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता

राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले; दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता

Radhanagari Dam's automatic gates flooded; gates likely to open soon | राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले; दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता

राधानगरी धरणाच्या स्वयंचलित दरवाजांना पाणी लागले; दरवाजे लवकरच उघडण्याची शक्यता

Radhanagari Dam गेल्या चार दिवसांत राधानगरी धरण क्षेत्रात २५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात यंदा जून ते आज अखेर १,००० मि. मी. पाऊस जास्त झाला आहे.

Radhanagari Dam गेल्या चार दिवसांत राधानगरी धरण क्षेत्रात २५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात यंदा जून ते आज अखेर १,००० मि. मी. पाऊस जास्त झाला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गौरव सांगावकर
राधानगरी : गेल्या चार दिवसांत राधानगरी धरण क्षेत्रात २५० मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत धरण क्षेत्रात यंदा जून ते आज अखेर १,००० मि. मी. पाऊस जास्त झाला आहे.

गुरुवारी सायंकाळी धरण ९० टक्के भरले. गतवर्षी २५ जुलैला धरण पूर्ण क्षमतेने भरून स्वयंचलित दरवाजे उघडले होते. सध्या धरणात ७.४५ टीएमसी पाणीसाठा असून पाणी पातळी ३४२.६२ फुटांवर असून. २०८.७७ दलघमी पाणी साठा उपलब्ध आहे.

राधानगरी धरणाच्या सेवा द्वारातून १,५०० क्युसेक तर वीजनिर्मिती केंद्रातून १,६०० क्यूसेक असा एकूण ३,१०० क्युसेकने विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरू आहे.

दुधगंगा काळम्मावाडी धरणात १८.४७ टी.एम. सी पाणी असून धरण ७३ टक्के भरले आहे. ६३९.८८ मी. पाणी पातळी आहे. तर धरणात ५२३.०९ द.ल.घ.मी. पाणी साठा उपलब्ध आहे.

तुळशी जलाशय धामोड ८० टक्के भरले असून ७९.०१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा उपलब्ध आहे. ६१३ मी. पाणी पातळी आहे. २.८९ टीएमसी भरले आहे.

धरण भरल्याची टक्केवारी
राधानगरी - ९०%
तुळशी - ८०%
काळम्मावाडी - ७३%

राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात जून ते आज अखेर एकूण २,८२७ मि.मी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी यंदा १,७०६ मिलिमीटर पाऊस झाला होता. जिल्ह्यातील एकूण ३७ बंधारे अद्याप पाण्याखाली आहेत.

अधिक वाचा: तुकड्यांतील जमीन नियमित करण्यासाठी नऊ सदस्यांची समिती स्थापन; १५ दिवसांत निर्णय देणार

Web Title: Radhanagari Dam's automatic gates flooded; gates likely to open soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.