अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील पास्टूल गावालगतचा मोर्णा प्रकल्प १० ऑगस्ट रोजी ५ वाजता १०० टक्के भरला असून, सांडव्यावरून विसर्ग सुरू झाला आहे. आजपर्यंत ४०३ मिमी पाऊस झाल्याची नोंद आहे.
या प्रकल्पात उपयुक्त साठा ४१.४६ मिमी असून, प्रकल्पाची जलाशय पातळी ३६६.९७ मीटर एवढी आहे. सकाळी ६ वाजता ९५ टक्के साठा उपलब्ध होता. केवळ ११ तासांमध्ये साठ्चात ५ टक्के वाढ होऊन सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. यावरून पाण्याची आवक चांगली असल्याचे दिसून येत आहे.
नऊ दिवस आधीच भरला प्रकल्प
गतवर्षी १९ ऑगस्टला प्रकल्प १०० टक्के भरून ओव्हरफ्लो झाला होता. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी नऊ दिवस अगोदर प्रकल्प पूर्णतः भरला आहे. या प्रकल्पाला उजवा आणि डावा असे दोन कालवे असून, पुढील रब्बी व उन्हाळी पिकांना पाणी मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे.
हेही वाचा : राज्याच्या 'या' कारागृहातील कैद्यांच्या शेती मेहनतीतून ६७ लाखांचे उत्पन्न; वाचा सविस्तर