मुंबई : मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३४ अंशावर स्थिर असला, तरी कमी-अधिक होणारी आर्द्रता मुंबईकरांचा घाम काढत आहे.
तर दुसरीकडे, राज्यभरात विदर्भासह मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमानाचा पारा ४० अंश नोंदविण्यात येत आहे.
चार ते पाच दिवस राज्यात मिश्र प्रकारचे हवामान राहील, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली.
विदर्भात २७ आणि २८ एप्रिल रोजी गारपिटीची शक्यता असून, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात उष्ण व दमट हवामानासह पाऊस पडू शकतो.
राज्यात कुठे किती तापमान? (अंश सेल्सिअसमध्ये)
मालेगाव ४३.२
उदगीर ४१.८
सातारा ३९.२
जळगाव ४१.५
परभणी ४४.४
नाशिक ३९
नंदुरबार ४३.३
पुणे ४०.२
बारामती ४०.४
सोलापूर ४२.१
बीड ४३.६
जेऊर ४२
अकोला ४५.१
अमरावती ४४.६
बुलढाणा ४०.६
चंद्रपूर ४५.४
गडचिरोली ४३.२
गोंदिया ४२.६
नागपूर ४४
वर्धा ४४.१
वाशिम ४३.४
यवतमाळ ४४.४