Lokmat Agro >हवामान > मराठवाड्यात आतापर्यंत १९३.४ मिमी पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस 'या' जिल्ह्यात

मराठवाड्यात आतापर्यंत १९३.४ मिमी पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस 'या' जिल्ह्यात

Marathwada has recorded 193.4 mm of rainfall so far; The highest rainfall is in this district | मराठवाड्यात आतापर्यंत १९३.४ मिमी पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस 'या' जिल्ह्यात

मराठवाड्यात आतापर्यंत १९३.४ मिमी पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस 'या' जिल्ह्यात

Rain In Marathwada :मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. २० दिवस झाले तरी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही.

Rain In Marathwada :मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. २० दिवस झाले तरी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही.

शेअर :

Join us
Join usNext

मे महिन्यात शेतकरी मशागतीत व्यस्त असताना अवकाळी पावसाने थैमान घालायला सुरुवात केली. २० दिवस झाले तरी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. त्यात आता हवामान विभागाने पुढील ५ दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

मराठवाड्यात मागील २० दिवसांत सर्वाधिक पावसाची नोंद लातूर जिल्ह्यात झाली. येथे १९३.४ मिमी पाऊस झाला. त्या खालोखाल धाराशिव जिल्ह्यात १६७.५ मिमी पाऊस झाला.

आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या माहितीनुसार, ६ मेपासून वादळ वाऱ्याला सुरुवात झाली. वीज कोसळून आतापर्यंत मराठवाड्यात २७ पेक्षा अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला. यंदा मराठवाड्याला मे महिन्याचे तापमान साधारण २९ ते ३५ अंश सेल्सिअसपर्यंत राहिले आहे. हवामान चक्र बिघडल्याचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बरसला.

शेतीत पाणीचपाणी

मृग नक्षत्र सुरू होण्यास अजून १३ दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वीच मान्सून सक्रिय होणार असल्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात येत असल्याने शेतकरी आणखी हवालदिल झाले आहेत. शेतात पाणी साचलेले असल्याने मशागत कधी करणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती पाऊस ? (जिल्हा - पाऊस मिमी)

छत्रपती संभाजीनगर - १२२.३
जालना - १३७.९
बीड - १३९.९
लातूर - १९३.४
धाराशिव - १६७.५
नांदेड - १०४.९
परभणी - २३.८
हिंगोली - १०२.८

हेही वाचा : जिद्दीला पेटला डी.एड धारक अन् तोट्याची शेती झाली फायद्याची; अमोदेच्या निवृत्तीरावांची वाचा 'ही' प्रेरणादायी कहाणी

Web Title: Marathwada has recorded 193.4 mm of rainfall so far; The highest rainfall is in this district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.