Lokmat Agro >हवामान > मांजरा धरण ओव्हरफ्लो; ९० किलोमीटर लांबीच्या प्रवासातून होसूर बॅरेजेसमधून कर्नाटक राज्यात पोहोचले विसर्गाचे पाणी

मांजरा धरण ओव्हरफ्लो; ९० किलोमीटर लांबीच्या प्रवासातून होसूर बॅरेजेसमधून कर्नाटक राज्यात पोहोचले विसर्गाचे पाणी

Manjara Dam overflows; Discharge water reaches Karnataka state through Hosur barrages after a 90-kilometer journey | मांजरा धरण ओव्हरफ्लो; ९० किलोमीटर लांबीच्या प्रवासातून होसूर बॅरेजेसमधून कर्नाटक राज्यात पोहोचले विसर्गाचे पाणी

मांजरा धरण ओव्हरफ्लो; ९० किलोमीटर लांबीच्या प्रवासातून होसूर बॅरेजेसमधून कर्नाटक राज्यात पोहोचले विसर्गाचे पाणी

Manjara Dam Water Update : मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे चार दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून तब्बल ३,४९४ क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

Manjara Dam Water Update : मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे चार दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून तब्बल ३,४९४ क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

मांजरा नदीच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पात पाण्याची मोठी आवक सुरू झाली आहे. त्यामुळे प्रकल्पाचे चार दरवाजे ०.२५ मीटरने उघडण्यात आले असून, त्यातून तब्बल ३,४९४ क्यूसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे.

प्रकल्पातून सोडण्यात आलेले हे पाणी मांजरा नदीच्या ९० किलोमीटर लांबीच्या प्रवासातून होसूर बॅरेजेसमधून कर्नाटक राज्यात पोहोचले आहे. शनिवारी दुपारी दोन वाजल्यापासून चार दरवाजे उघडून सध्याही पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

मांजरा नदीच्या होसूर बॅरेजेसमधून या पावसाळ्यात ९४.२६ दशलक्ष घनमीटर पाणी खाली सोडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, परतीच्या पावसात अनेकदा पूर येणारी ही नदी यंदा ऑगस्ट महिन्यातच तिच्या उगमस्थानापासून संगमापर्यंत दुथडी भरून वाहत आहे. यामुळे बळीराजा सुखावला असून, शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाले आहे.

या पावसाळ्यात लवकर नदी वाहत असल्यामुळे मांजरा नदीवर लासरा, बोरगाव, अंजनपूर, वांजरखेडा, वांगदरी, कारसा, पोहरेगाव, नागझरी, साई, खुलगापूर, शिवणी, घरणी, बिदगीहाळ, डोंगरगाव, होसूर आणि भुसनी हे बॅरेजेस भरणार आहेत. या बॅरेजेसमधील पाण्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना होत आहे.

जलसिंचनामुळे नदीखोरे सुपीक झाले असून, येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे नदीच्या वरच्या खोऱ्यात उसाचे पीक तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये आणि तेलबियांचे उत्पादन घेतले जाते. या पाण्यामुळे यंदा संपूर्ण नदीकाठ समृद्ध राहील.

सर्वाधिक लाभ क्षेत्र लातूर जिल्ह्यामध्ये..!

• मांजरा प्रकल्पाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून जवळपास १८ हजार हेक्टर च्या आसपास हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आलेले आहे. या क्षेत्रापैकी सर्वाधिक लाभ क्षेत्र लातूर जिल्ह्यातील आहे.

• धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यात या प्रकल्पाचे लाभक्षेत्र क्षेत्र असून, त्याचा सर्वाधिक फायदा उजव्या कालव्यातून लातूरला होतो आहे.

• विशेष म्हणजे लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही याच प्रकल्पावर अवलंबून आहे. त्यामुळे यंदा ऑगस्ट महिन्यात हे धरण भरल्यामुळे लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

कर्नाटकात पाणी

'मांजरा प्रकल्पाचे चार दरवाजे उघडण्यात आल्यामुळे खाली नदीवर असलेले बरेजसचे दरवाजे खुले ठेवून नदीपात्रात विसर्ग केला आहे. काल शनिवारपासून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे. मांजरा नदीवरील होसूर बरेजेसमधून आतापर्यंत या पावसाळ्यात ९४.२६ द.ल.घ.मी. पाणी कर्नाटकात गेले आहे. - सूरज निकम, अभियंता.

मांजरा प्रकल्पावर दृष्टिक्षेप

• प्रकल्पाची उभारणी १९८०-८१ मध्ये झाली असून, धरणाला १८ दरवाजे असून, आतापर्यंत धरण १६ वेळा भरले आहे.

• प्रकल्पाचा उपयुक्त जलसाठा १७६.९६ दलघमी असून, मृतजलसाठा ४७.१३० दलघमी आहे. पहिल्यांदा नऊ वर्षांनंतर धरण १९८८-८२ मध्ये भरले होते.

• १९८८-८९ नंतर धरण सलग २००१-२००५, २०१२-२०१६, २०१८-२०१९, २०१९-२०२० मध्ये कोरडे पडले होते.

• मांजरा धरणाचे दोन कालवे असून, उजवा कालवा ७८ कि.मी. चा तर डावा कालवा ९० कि.मी. अंतराचा आहे. या दोन्ही कालव्याअंतर्गत १८ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.

• बीड, लातूर आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांत धरणाचे लाभक्षेत्र आहे. सर्वाधिक लाभक्षेत्र लातूर जिल्ह्यात आहे.

• ७० टक्क्यांच्या आसपास सातवेळा, ७० ते ९० टक्क्यांच्या आसपास पाचवेळा धरण भरले होते.

१०० लातूर शहराच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

टक्के मांजरा प्रकल्प १६ वेळा भरला असून, अनेक पावसाळ्यामध्ये कोरडेही राहिले आहे. गेल्या काही वर्षांपासून या धरणावरच लातूर शहराचा पाणीपुरवठा आहे. त्यामुळे लातूरसाठी हे धरण भरणे अत्यंत महत्वाचे आहे. यंदा ऑगस्टमध्येच धरण भरल्याने चिंता मिटली आहे.

हेही वाचा : वहिवाट, शेतरस्ता होणार मोकळा होणार; शेतकऱ्यांना मोफत पोलिस बंदोबस्त देण्याबाबत गृह विभागाचा मोठा निर्णय

Web Title: Manjara Dam overflows; Discharge water reaches Karnataka state through Hosur barrages after a 90-kilometer journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.