Maharashtra Weather Update : राज्यात थंडीचा कडाका दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात थंडी वाढली असून आता शेकोट्या पेटू लागल्या आहेत. शनिवारी तापमानात मोठी घट झाली.
तर पुढील काही दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. शनिवारी राज्यातील सर्वात कमी तापमान धुळ्यात नोंदवले गेले. या जिल्हात ४.४ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली.
तर जळगाव जिल्ह्यात ८.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील थंड हवेच्या प्रवाहात वाढ झाली असून त्यामुळे राज्यात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत पुणे, मुंबईसह संपूर्ण राज्यात कडक्याची थंडी व धुके पडण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तेरकडील थंड वाऱ्यांचा जोर वाढला आहे. तर दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्यांमुळे कमी दाबचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या सोबतच लक्षद्वीप व मालदीव भागातही कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली आहे.
पुण्यात थंडी वाढली
पुण्यात शनिवारी थंडीचा कडाका वाढला. पुण्यात शनिवारी १०.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. तर रविवारी सकाळी देखील मोठ्या प्रमाणात गारठा पडला असून धुके पडले होते. थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पुण्यात होते.
पुण्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असून तापमानात घट होण्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी- चिंचवडसह संपूर्ण जिल्ह्यातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे.
उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. काही जिल्ह्यात तापमान हे ९ ते १० अंशांवर आले आहे. पुढील काही दिवसांत राज्यात थंडीची लाट आणखी सक्रिय होणार आहे. ही लाट १८ डिसेंबर पर्यंत आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात देखील थंडी वाढली असून पुढील काही दिवसांत थंडीत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून यामुळे कमाल व किमान तापमानात कोणताही बदल होणार नसला तरी थंडी वाढणार आहे.
धुळ्यात सर्वात कमी तापमान
शनिवारी धुळ्यात सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली. धुळ्यात ४.४ अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदविण्यात आले. त्या पाठोपाठ निफाड ६.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदिवण्यात आले तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव, अहिल्यानगर, जेऊर, नाशिक, मालेगाव, मराठवाड्यातील परभणी, विदर्भातील गोंदिया, वर्धा, नागपूर येथे तापमान १० अंशांच्या खाली नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* मृग बहार धरलेल्या संत्रा/ मोसंबी बागेत फळ वाढीसाठी जिब्रॅलिक ॲसिड १.५ ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
* संत्रा/मोसंबी बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे.
* संत्रा/मोसंबी बागेत आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* काढणीस असलेल्या डाळींब फळांची काढणी करून घ्यावी.
* चिकू बागेत अंतरमशागतीची कामे करून तण नियंत्रण करावे व आवश्यकतेनुसार पाणी द्यावे.
Maharashtra Weather Updates : राज्यात बोचरी थंडी आणि शीत लहरीचा प्रभाव; Imd चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Updates : राज्यात बोचरी थंडी आणि शीत लहरीचा प्रभाव; Imd चा रिपोर्ट वाचा सविस्तर
राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शनिवारी तापमानात मोठी घट झाली असून पुढील काही दिवस थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather Updates)
राज्यात थंडीचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शनिवारी तापमानात मोठी घट झाली असून पुढील काही दिवस थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Maharashtra Weather Updates)
Join usNext