Maharashtra Weather Update : यंदाचा उन्हाळा (summer) महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) सोमवारी वर्तविली.
एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या हंगामात महाराष्ट्रासह देशात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून, उष्णतेच्या लाटांचे दिवसही सरासरीपेक्षा जास्त असू शकतात, असे IMD ने सांगितले आहे. एप्रिल महिन्यासह पुढील तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी (३१ मार्च) रोजी जाहीर केला.
त्यानुसार, एप्रिल महिन्यात आणि एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या हंगामात दिवसा आणि रात्री तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन महिन्यांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळचा दक्षिण भाग या ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
राज्यात आणि देशात इतरत्र कमाल तापमान सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. याच काळात देशाच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवले जाण्याची शक्यता अधिक आहे.
यंदाचा उन्हाळा (summer) महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागांसाठी तापदायक ठरण्याची शक्यता हवामान विभागाने (IMD) वर्तविली आहे. एप्रिल ते जून या काळात उन्हाळ्याच्या हंगामात महाराष्ट्रासह देशात कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता असून, उष्णतेच्या लाटांचे दिवसही सरासरीपेक्षा जास्त असू शकतात, असे आयएमडीने स्पष्ट केले आहे.
एप्रिल महिन्यात आणि एप्रिल ते जून या उन्हाळ्याच्या हंगामात दिवसा आणि रात्री तापमानाचा पारा सरासरीच्या वर राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन महिन्यांमध्ये दक्षिण मध्य महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळचा दक्षिण भाग या ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
राज्यात आणि देशात इतरत्र कमाल तापमान सरासरीच्या वर राहू शकते. याच काळात देशाच्या बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदले जाण्याची शक्यता अधिक आहे.
एप्रिल ते जून या दरम्यानच्या काळात महाराष्ट्रासह मध्य, वायव्य, उत्तर आणि पूर्व भारतामध्ये उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा ७ ते ८ दिवस जास्त असू शकतो. एप्रिलमध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या मराठवाड्यात सरासरीइतका किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता अधिक असल्याचेही अंदाजात म्हटले आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* काढणीस तयार असलेल्या मृग बहार संत्रा/मोसंबी फळांची काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
* संत्रा/मोसंबी बागेस आवश्यकतेनुसार सकाळी किंवा संध्याकाळी पाणी द्यावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी फळझाडाच्या आळ्यात आच्छादन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.