Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर सायक्लोनिक सर्क्युलेशनचा काय होईल परिणाम? IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर सायक्लोनिक सर्क्युलेशनचा काय होईल परिणाम? IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: What will be the impact of cyclonic circulation on Maharashtra? Read IMD report in detail | Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर सायक्लोनिक सर्क्युलेशनचा काय होईल परिणाम? IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रावर सायक्लोनिक सर्क्युलेशनचा काय होईल परिणाम? IMD चा रिपोर्ट वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : दक्षिण केरळ आणि अरबी समुद्रात पूर्वेकडून एक सायक्लोनिक सर्क्युलेशन येत आहेत. ते चक्रीवादळात बदलणार का यावर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. त्याचा राज्यातील हवामानावर कसा होईल परिणाम वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : दक्षिण केरळ आणि अरबी समुद्रात पूर्वेकडून एक सायक्लोनिक सर्क्युलेशन येत आहेत. ते चक्रीवादळात बदलणार का यावर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. त्याचा राज्यातील हवामानावर कसा होईल परिणाम वाचा सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather Update : दक्षिण केरळ आणि अरबी समुद्रात पूर्वेकडून एक सायक्लोनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation) येत आहेत. ते चक्रीवादळात बदलणार का यावर हवामान विभाग लक्ष ठेवून आहे. त्याचा राज्यातील हवामानावर कसा होईल परिणाम वाचा सविस्तर

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या खाडीपासून (Bay of Bengal) काही अंतरावर आणि राजस्थानलगतच्या भागातील हवामानात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मोठे बदल होत आहेत. त्याचा परिणाम हवामानावर होत आहेत. वातावरणात सतत बदल होताना दिसत आहे तर पहाटेच्या सुमारास गारवा तर दिवसा उन्हाचे तीव्र चटके जाणवत आहेत.

किमान तापमानात घट होत असल्याने पुन्हा गारठा (Cold) वाढू लागला आहे. कोकण किनारपट्टीलगच्या जिल्ह्यांमध्ये मात्र गारठा गायब झाला आहे. तिथे उकाड्यात (Hot) वाढ होताना दिसत आहे.

गेले काही दिवस पहाटे धुक्याची चादर तर दिवसा उन्हाचे चटके बसत आहेत. मुंबई, उपनगरात दमट वातावरणामुळे घामाच्या धारा वाहात आहेत. तर ठाणे नवी मुंबईत पहाटे गारवा आणि दिवसा जास्त उष्णता जाणवत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात देखील हवामानात बदल होत असून काही ढिकाणी ढगाळ हवामान असणार आहे. तर वातावरणातील गारठा काहीसा कमी झाल्याचे चित्र आहे. उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भातील काही भागांमध्ये थंडीचा कडाका अजूनही कायम आहे. दुपारी मात्र उन्हाचे चटके बसत आहेत. राज्यात येत्या आठवड्यात किमान तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

मराठावाड्यातील हवामान

मराठवाड्यात येत्या पाच दिवसात तापमानात २-३ अंश सेल्सिअसने वाढ होणार असून कोरडे व शुष्क वारे वाहणार आहेत. त्यामुळे मराठवाड्यातही किमान व कमाल तापमानात बदल होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* केळी बागेस आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. केळी बागेत फळांचा आकार वाढवण्यासाठी ००:५२:३४ १.५ ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

* भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजीपाला पिक तण विरहीत ठेवावे व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची पिकाची काढणी करून घ्यावी.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : कुठे थंडी तर कुठे उकाडा; काय सांगतोय आजचा IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Web Title: Maharashtra Weather Update: What will be the impact of cyclonic circulation on Maharashtra? Read IMD report in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.