१७ ते २० मार्च दरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे.
मेघगर्जनेसह वादळी पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १७ मार्च रोजी वादळी पावसाची सर्वाधिक शक्यता राज्यातील दक्षिण भागांमध्ये राहील.
यात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिणेकडील जिल्ह्यांचा समावेश असून प्रामुख्याने तेलंगणा आणि कर्नाटक सीमेजवळील भाग प्रभावित होण्याची शक्यता आहे.
१८ ते २० मार्च दरम्यान वादळी पावसाची तीव्रता आणि क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील ठिकठिकाणी ढगाळ वातावरणासह वादळी पावसाची शक्यता आहे.
गुढीपाडव्यापासून पुढील तीन दिवस वातावरणात बदल होऊन अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी लागणार आहे.
या जिल्ह्यांमध्ये अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धाराशिव, लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याचाही अंदाज आहे. त्यामध्ये बुधवारी (दि. १८) रोजी अमरावती, अकोला, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या सहा जिल्ह्यांमध्ये किरकोळ गारपीट होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?◼️ रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.◼️ काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत.◼️ तसेच बाजार समित्यांमध्ये आणलेले धान्य व इतर कृषीमाल पावसापासून सुरक्षित राहील यासाठी त्यावर ताडपत्री किंवा अन्य संरक्षणात्मक आच्छादन करावे, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.◼️ मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची व पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी.◼️ अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अधिक वाचा: लाल मिरचीच्या दरात दुपटीने वाढ, मसालेही खाता आहेत भाव; वाचा किलोला किती रुपये दर?
Web Summary : Maharashtra faces thunderstorms and hail (March 17-20), especially in southern regions. Farmers should protect harvested crops. Agriculture department advises safety during storms, avoiding trees and power lines. Weather stabilizes from March 21.
Web Summary : महाराष्ट्र में (17-20 मार्च) गरज के साथ तूफान और ओलावृष्टि की आशंका है, खासकर दक्षिणी क्षेत्रों में। किसानों को काटी गई फसलों को सुरक्षित रखने की सलाह दी गई है। कृषि विभाग ने तूफान के दौरान पेड़ों और बिजली लाइनों से बचने की सलाह दी है। 21 मार्च से मौसम स्थिर होने की उम्मीद है।