Maharashtra Weather Update : अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती (Conditions of cyclonic winds in the Arabian Sea) सक्रिय झाली आहे. पश्चिमी विक्षोभच्या (Western Disturbance) तीव्रतेमुळे राज्यात थंडी कमी तर कधी जास्त पडत असून उत्तरेकडील राज्यांमध्ये धुक्याची चादर पाहायला मिळत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बंगालच्या उपसागरात येणाऱ्या बाष्पयुक्त (Steamy) वाऱ्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे दाखल होत आहेत या वाऱ्यामुळे पावसाला पोषक परिस्थिती निर्माण झाली असून काही ठिकाणी आज (१५ जानेवारी) रोजी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
थंडीचा कडका कमी
राज्यातील अनेक भागात थंडीचा कडाका कमी झाला असून धुके आणि ढगाळ हवामानाने किमान तापमानात काहीश्या प्रमाणात वाढ झालेली दिसते. तर पहाटे गारवा आणि धुक्याची चादर बहुतांश ठिकाणी पाहायला मिळत आहे.
राज्यात येत्या काही दिवसात ढगाळ हवामानाची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तापमानात चढ- उतार राहू शकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. येत्या तीन दिवसात महाराष्ट्रात किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होणार आहे. ढगाळ हवामान असल्याने गारठा कमी होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* बदलते हवामान लक्षात घेता जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यात 'या' ठिकाणी बाष्पयुक्त वाऱ्याने थंडीत वाढ; वाचा हवामान अंदाज सविस्तर