मुंबईसह कोकणात अधून-मधून कोसळधारा सुरू असतानाच हवामान विभागाने शुक्रवारी रायगड, रत्नागिरी जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावरच्या परिसरांना रेड अलर्ट दिला आहे.
तर मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर परिसराला ऑरेंज अलर्ट दिला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांनाही रेड अलर्ट आणि नागपूर, वर्धा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे चित्र ठळक होण्याची शक्यता असून, ती पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनाऱ्याकडे येण्याची शक्यता आहे.
विदर्भापासून कमी दाबाच्या केंद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. मध्य महाराष्ट्रापासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.
दरम्यान, बुधवारी मुंबईला झोडपून काढलेल्या पावसाने गुरुवारी विश्रांती घेतली असली तरी अधून-मधून पावसाचा मारा सुरूच होता.
अधिक वाचा: Ranbhajya: पावसाळ्यात रानभाज्यांची जादू; चवीबरोबरच 'या' रानभाज्यांचा आरोग्यालाही मोठा फायदा