Lokmat Agro >हवामान > Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा हवापालट; कसे असेल आजचे हवामान ते वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा हवापालट; कसे असेल आजचे हवामान ते वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: latest Weather news update in maharashtra Read in detail what will be the weather like today | Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा हवापालट; कसे असेल आजचे हवामान ते वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुन्हा हवापालट; कसे असेल आजचे हवामान ते वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात पुन्हा बदलताना दिसत आहे. दिवसा उकाडा जाणवत असताना काही जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा (Cold) जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज (२१ जानेवारी) रोजी कसे असेल हवामान ते जाणून घेऊयात सविस्तर

Maharashtra Weather Update: राज्यातील हवामानात पुन्हा बदलताना दिसत आहे. दिवसा उकाडा जाणवत असताना काही जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा (Cold) जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज (२१ जानेवारी) रोजी कसे असेल हवामान ते जाणून घेऊयात सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

Maharashtra Weather update: राज्यातील हवामानात सातत्याने बदल (climate change) होत आहेत. आज पुण्यातील तापमान १३ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून पुढील काही दिवसांत यात आणखी घट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

राज्यातील हवामानात पुन्हा बदलताना दिसत आहे. दिवसा उकाडा जाणवत असताना काही जिल्ह्यात किमान तापमानात घट होऊन थंडीचा (Cold) जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. आज (२१ जानेवारी)  रोजी कसे असेल हवामान ते जाणून घेऊयात सविस्तर

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यात आज(२१ जानेवारी) रोजी आकाश मुख्यतः निरभ्र असणार आहे. पुण्यातील कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १३ अंश सेल्सिअस इतके असण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांत किमान तापमानात पुन्हा घट होण्याची शक्यता असून पुणेकरांना पुन्हा एकदा गारठा जाणवणार आहे.

राज्याच्या तापमानात हलका बदल होत असून सध्या श्रीलंका आणि तमिळनाडू समुद्रात चक्राकार वाऱ्यांचा प्रभाव आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. परिणामी तापमानात बदल होत असून राज्यात अनेक भागात ढगाळ हवामान होते. गारठा कायम असून मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तापमानात १-३ अंशांनी घट झाली आहे. दरम्यान,हवामान विभागाने आता महाराष्ट्रात तापमान वाढणार असल्याचे सांगितले आहे.

सध्या चक्राकार वारे (Circular Ones) राजस्थान आणि परिसरात सक्रीय आहेत. दक्षिणेकडील राज्यात सध्या तुफान पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये प्रचंड थंडी आहे. याचा परिणाम राज्याच्या तापमानावर होत असून गेल्या काही दिवसात होणारा तापमानातला चढ - उतार हे यामागचे कारण आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* जनावरे आजारी पडू नयेत म्हणून पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जनावरांना जंतनाशक पाजावेत व लसीकरण करून घ्यावे.  

* दूध व्यवसाय करताना आपल्या शंकांच्या निरसनासाठी अनुक्रमे १८००-२३३-०४१८ आणि १८००-२३३-०४१८  या टोल फ्रि क्रमांकावर पशुसंवर्धन खाते व पशुवैद्यक विद्यापीठाशी संपर्क करावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
 
हे ही वाचा सविस्तर :
Maharashtra Weather Update : राज्यात सकाळी गारवा तर दुपारी उकाडा जाणवणार; IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

Web Title: Maharashtra Weather Update: latest Weather news update in maharashtra Read in detail what will be the weather like today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.