Maharashtra Weather Update : राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये उकाडा वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर येत्या ४८ तासात अवकाळींचा सामना शेतकऱ्यांसह नागरिकांना करावा लागणार आहे.(weather update)
एकिकडे अवकाळीचा मारा आणि दुसरीकडे वादळी पाऊस या एकंदर परिस्थितीमुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानात चढ- उतार होताना दिसत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, देशात मध्य प्रदेशापासून विदर्भासहमराठवाडा, कर्नाटक, तामिळनाडू ते मन्नारच्या आखातापर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे.
शिवाय मध्य प्रदेशासह समुद्रसपाटीपासून नजीकच्या भागांमध्ये साधारण ९०० मीटर उंचीवर चक्राकार वारे (Cyclone) वाहताना दिसत आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत असून राज्याच्या बहुतांश भागांमध्ये वादळी पावसासह गारपिटीचा इशारा जारी करण्यात आला आहे.(weather update)
राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात येत्या 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(weather update)
मराठवाडा आणि विदर्भातील या हवामानाचा परिणाम राज्याच्या उर्वरित भागांवरही होताना दिसत आहे. मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात आकाश अंशत: ढगाळ राहील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान सध्या राज्याच्या पर्वतरांगांमध्येही उष्णतेचा तडाखा जाणवत आहे.(weather update)
शेतकऱ्यांना सल्ला
फळबागेचे व्यवस्थापन करताना वादळी वारा व पावसामुळे फळबागेत पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत, तसेच मोडलेल्या फांद्यांची छाटणी करावी. नवीन लागवड केलेल्या व लहान फळ झाडांना काठीने आधार द्यावा, सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update: राज्यातील 'या' भागात अवकाळीचा इशारा; वाचा IMD रिपोर्ट सविस्तर