Maharashtra Weather Forecast : राज्यात हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अवकाळीचा मारा सुरुच आहे. गारपिटीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. IMD ने आजही हाय अलर्ट (High alert) जारी केला आहे.
मराठवाड्याला या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसताना दिसतोय. त्याबरोबरच राज्यातील अनेक ठिकाणी अवकाळीच्या सरी बरसताना दिसत आहेत. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडला. मराठवाड्यामध्ये तर अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. (High alert)
IMD ने दिलेल्या माहिती नुसार, राज्यात सध्या अवकळीचे ढग कायम असल्याचे पावसासाठी पोषक असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आजही राज्यात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. (High alert)
सध्या चक्राकर वारे वाहत आहे. यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील बाष्प वाऱ्यामुळे संगम होत आहे. मुंबईतही सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याचे बघायला मिळाले. (High alert)
अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हात देखील वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. होळीनंतर पारा वाढणार असल्याचे हवामान विभागाने कळविले होते. तर दुसरेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची स्थिती निर्माण झाल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. (High alert)
या भागात यलो अलर्ट
राज्यात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात आजही हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भाागात वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होईल. यासोबतच काही भागांमध्ये गारपिटीचा देखील इशाराही देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, मळणी न केलेल्या व मळणीस तयार असलेल्या गहू पिकाची लवकरात लवकर मळणी करावी. मळणी करणे शक्य नसल्यास काढणी केलेला माल ताडपत्रीने झाकून ठेवावा. मळणी केलेला माल पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
हे ही वाचा सविस्तर : Avkali Paus: शेतकऱ्यांना अवकाळीची धास्ती; वातावरणातील बदलाची चिंता वाचा सविस्तर