Maharashtra Weather Update : उत्तर भारतात कडाक्याच्या थंडी वाढताना दिसत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यातही दिवसा गार वारे वाहत असून काही ठिकाणी ढगाळ (Cloudy) वातावरण आज (१४ जानेवारी) पाहायला मिळाले.
राज्यात थंड वाऱ्याचा (Cold Wave) जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भात किमान पारा खाली जाण्याचा अंदाज आहे. बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात येत्या २ दिवसांत ढगाळ हवामान राहण्याचा आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती (Cyclic Condition of Wind) निर्माण झाली आहे. त्यामुळे बंगालच्या उपसागरावरून प्रामुख्याने दक्षिण विदर्भ, दक्षिण मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे या भागात ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.
राज्यातील काही भागात थंडीदेखील या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे काही प्रमाणात कमी झाली आहे. येत्या ४ दिवसात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
तर उद्या (१५ जानेवारी) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. थंड वाऱ्याचा जोर जास्त राहिल्यास उत्तर महाराष्ट्र, उत्तर विदर्भातील किमान तापमानात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहीत ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे. काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून घ्यावी.