Join us

Maharashtra Weather Update : बुधवारपासून महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2024 18:47 IST

ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातील वातावरणीय घडामोडी वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : आतापर्यंत महाराष्ट्रात शनिवार (१२ ऑक्टोबर)  दसऱ्या पर्यन्त पावसाच्या उघडीपीची शक्यता वर्तविलेली आहे. परंतु आता ही शक्यता मंगळवार (८ ऑक्टोबर) पर्यंतच मर्यादित राहू शकते.

ऑक्टोबरच्या (९ ते १३) दरम्यानच्या आवर्तनात पावसाची शक्यता बुधवार ते शुक्रवार (९ ते ११ ऑक्टोबर)  पर्यंतच्या ३ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी वीजा व गडगडाटीसह किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. पावसाची तीव्रता त्यानंतरही दोन दिवस असु शकते.विशेषतः सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व संपूर्ण मराठवाडा अश्या १३ जिल्ह्यात मात्र मध्यम स्वरूपाच्या वळीव पावसाची शक्यता ह्या ३ दिवसात अधिक जाणवते.

शेतकामे उरकण्याची संधी                संपुर्ण महाराष्ट्रात मंगळवार(८ ऑक्टोबर) पर्यन्त खरीप पीक - काढणी, रब्बी लागवडीसाठीची मशागत, सोयाबीनचे खळे, हरबरा पेर, नवीन उन्हाळ कांदा रोप-टाकणी, आगाप लाल कांदा काढणी, ऊस लागवड, रोप जर उपलब्ध असेल तर आगाप रांगडा-लाल कांदा लागवड, तर टप्प्या-टप्प्यातील द्राक्षे बाग-छाटणी आदी शेतकामे, शेतकऱ्यांनी उरकण्याचा प्रयत्न करावा, असे वाटते.

इशारा दिला जाईल              यातही वातावरणात जर काही बदल जाणवलाच तर शेतकऱ्यांना २ ते ३ दिवस अगोदरच सुचित करता येईल, असे वाटते. तरी पण उर्वरित २३ जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी न घाबरता शेत कामावर झडपच घालावी, असे वाटते.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यातील वातावरणीय घडामोडी

कोजागिरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी (१५ ते ३१ ऑक्टोबर) दरम्यानच्या दुसऱ्या पंधरवड्यातील पावसाळी वातावरण हे 'ला-निना' विकसन किंवा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात, घसरणाऱ्या हवेच्या दाबांतून कदाचित चक्रीवादळाची बीज रोवणी किंवा ५ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्त दरम्यान  पुर्वेकडून वाहणाऱ्या मजबुत आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्रात ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात म्हणजे कोजागिरी पौर्णिमा ते नरक चतुर्दशी (१५ ते ३१ ऑक्टोबर) दरम्यान मध्यम पावसाची शक्यता जाणवते. - माणिकराव खुळे,  जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते, पुणे.

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाऊसमहाराष्ट्रसोलापूरकोल्हापूरकोकणमराठवाडा