महापुरामुळे गंभीर परिस्थिती बनलेला मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पुन्हा आभाळ फाटणार आहे. आठवड्याच्या शेवटी बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे क्षेत्र कोकणातून सौराष्ट्रकडे आगेकूच करणार आहे.
परिणामी शनिवार, रविवार व सोमवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील आतील भागात मुसळधार पाऊस होईल. तीन दिवसांत मिळून ४०० मिमी पाऊस पडेल.
२६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबरदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढेल. २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत प्रमाण वाढलेलेच राहील.
तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात विजेचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडेल.
२ ते ३ ऑक्टोबरपर्यंत हीच परिस्थिती कायम असेल, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
अधिक वाचा: अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईचा जीआर आला; कोणत्या जिल्ह्याला किती निधी?