पावसाची दोन महिने वाट पाहणाऱ्या मराठवाड्यात गेल्या पंधरा दिवसांत सरासरीपेक्षा ६०% जास्त पाऊस झाल्याने पूरस्थिती ओढावली. त्यात भर म्हणजे मध्य महाराष्ट्रातही गेल्या आठवडाभरात पावसाचा कहर सुरू आहे.
त्यामुळे मराठावाडा जलमय झाला असून, दोन आठवड्यांत मराठवड्याचे चित्रच बदलले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात सरासरीपेक्षा २० टक्के अधिक पाऊस झाला आहे.
रविवारीही मराठवाड्यासह, नाशिक, जळगाव, नंदुरबार, पुणे, अहिल्यानगर, मुंबई, ठाणे, पुणे आणि पालघर जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले. सोलापुरात सीना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. नाशिकमध्ये गोदेला आलेला पूर कायम आहे.
पावसाचा ट्रेंड यंदा बदलला?◼️ भारतात पावसाचा ट्रेंड बदलत चालला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. १९७१ ते २०२० च्या सरासरी पावसाचा ट्रेंड पाहिला तर मराठवाडा आणि विदर्भाचा काही भाग, जळगाव, नंदुरबार या भागात कमी पाऊस होता.◼️ यंदा १ जुन ते २६ सप्टेंबरपर्यंतचा ट्रेंड पाहिला तर या भागात जास्त पाऊस झाल्याचे स्पष्ट दिसते. देशातील अनेक भागात असेच चित्र बदल आहे.
महाराष्ट्रात आज कुठे कोणता अलर्ट?◼️ ऑरेंज अलर्ट : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे.◼️ यलो अलर्ट : नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.◼️ यलो अलर्ट (३० सप्टेंबर) : मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नांदेड.
गुजरातसह पश्चिम भारतात आज जोरधारापश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच गुजरात येथे आज जोरधारा आहेत, काही भागांत ऑरेंज तर काही भागात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
अधिक वाचा: अतिवृष्टी झालेल्या भागात 'या' तीन निकषांमध्ये अडकू शकते राज्य सरकारची मदत; वाचा सविस्तर