Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Maharashtra Rain Alert : राज्यातील तापमान किंचित घटणार; 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशरा

Maharashtra Rain Alert : राज्यातील तापमान किंचित घटणार; 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशरा

Maharashtra Rain Alert : Temperatures will drop slightly in the state; Warning of unseasonal rain in 'these' districts | Maharashtra Rain Alert : राज्यातील तापमान किंचित घटणार; 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशरा

Maharashtra Rain Alert : राज्यातील तापमान किंचित घटणार; 'या' जिल्ह्यांत अवकाळी पावसाचा इशरा

Maharashtra Rain Alert संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढत असताना आता वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Maharashtra Rain Alert संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढत असताना आता वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढत असताना आता वातावरणात होणाऱ्या बदलांमुळे उकाड्यापासून थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

विदर्भात मंगळवार, बुधवार व गुरुवारी पाऊस कोसळेल, तर उर्वरित राज्यातील कमाल तापमान किंचित घटेल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तवला आहे. अमरावतीत सोमवारी सर्वाधिक ४६.६ अंश तापमानाची नोंद झाली. 

महाराष्ट्रात १ मेपर्वी पुन्हा पश्चिमेकडील वारे सक्रिय होत आहेत. त्यामुळे तापमानात घट होईल. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर तापमान सरासरीपेक्षा कमी राहील.

मध्य महाराष्ट्रात तापमान ३८ पर्यंत घटेल. मराठवाड्यात तापमान ४० अंश सेल्सिअसहून अधिक राहील. खानदेश आणि विदर्भात तापमान ४० पर्यंत घसरण्याची शक्यता.

या जिल्ह्यांत पावसाचा अंदाज
विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये बुधवारपर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरींचा अंदाज आहे.

१ मेपर्यंत वादळांची शक्यता
उत्तर भारतापासून पूर्वोत्तर राज्यांपर्यंत तसेच हिमालयीन भागात १ मेपर्यंत प्री-मॉन्सून वादळांची (थंडरस्टॉर्म्स) शक्यता आहे. या भागांमध्ये उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.

अधिक वाचा: पुरंदर विमानतळ भूसंपादनासाठी जमिनीचा दर ठरणार; शेतकऱ्यांना मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा

Web Title : महाराष्ट्र में बारिश का अलर्ट: तापमान में गिरावट, कुछ जिलों में वर्षा

Web Summary : महाराष्ट्र में तापमान में थोड़ी गिरावट आएगी। विदर्भ में बारिश होगी, जिससे गर्मी से राहत मिलेगी। पश्चिमी हवाएं फिर से सक्रिय हो रही हैं, जिससे मुंबई और कोंकण में तापमान कम होगा। नागपुर सहित विदर्भ के कुछ हिस्सों में हल्की बारिश हो सकती है। उत्तर और पूर्वोत्तर भारत में मानसून से पहले तूफान की भविष्यवाणी की गई है।

Web Title : Maharashtra Rain Alert: Temperature Drop Expected; Rain in Some Districts

Web Summary : Maharashtra's temperature will slightly decrease. Vidarbha will experience rain, offering relief from the heat. Western winds are reactivating, lowering temperatures in Mumbai and Konkan. Parts of Vidarbha, including Nagpur, may see light showers. Pre-monsoon storms are predicted in northern and northeastern India.