Lokmat Agro >हवामान > Girna Dam : गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल, 29 ऑगस्टपर्यंत धरण किती टक्के भरले? 

Girna Dam : गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल, 29 ऑगस्टपर्यंत धरण किती टक्के भरले? 

Latest news Nashik dam Storage 86 percent water storage in Girna Dam | Girna Dam : गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल, 29 ऑगस्टपर्यंत धरण किती टक्के भरले? 

Girna Dam : गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल, 29 ऑगस्टपर्यंत धरण किती टक्के भरले? 

Girna Dam : गिरणा धरणात सातत्याने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे हे धरणही ओव्हरफ्लो होऊ शकते.

Girna Dam : गिरणा धरणात सातत्याने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे हे धरणही ओव्हरफ्लो होऊ शकते.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बहुतांश धरणे काठोकाठ भरली असून गिरणा धरणाने (Girna Dam) शंभरीकडे आगेकूच कायम ठेवली आहे. धरणात १८ हजार १८० दलघफू जलसाठा झाला असून त्याची टक्केवारी ८६.८२ इतकी आहे. गत आठवड्यात १९०५ दलघफू जलसाठवण क्षमता असणारे मन्याड धरणही ओव्हरफ्लो झाल्याने बळीराजा सुखावला आहे. 

मन्याडमधून (Manyad Dam) सिंचनासाठी तीन आवर्तने मिळणारच असून यामुळे या परिसरातील १९ गावांतील शेकडो एकरवरील शेती हंगाम बहरणार आहे. गिरणा धरणातूनही सिंचनासाठी या जलसाठ्यानुसार दोन, तर पेयजलासाठी पाच आवर्तने देणे शक्य होणार आहे. शतकी सलामी दिल्यास सिंचनासाठी अजून एक आवर्तन मिळू शकते. मन्याड परिसरात व धरणाच्या वरील भागात गत आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याने दीड महिना कोरडेठाक असलेले हे धरण शंभर टक्के भरले. याचा थेट फायदा रब्बी हंगामालाही होणार आहे. 

गिरणातील साठ्याने निम्म्या जिल्ह्याला दिलासा
शुक्रवारी गिरणा धरणात ८६.८२ टक्के जलसाठा झाला आहे. गिरणा धरणाच्या वरील सर्व जलप्रकल्प भरले असून, पाण्याची आवक होत आहे. गिरणेच्या अमृतधारेनेच निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागते. गेल्यावर्षी ३० ऑगस्ट रोजी गिरणाने शतक ठोकले होते. यंदा मात्र हे वेळापत्रक काहीसे लांबणार आहे.

गिरणा धरणात ८६.८२ टक्के जलसाठा झाला आहे. या जलसाठ्यानुसार सिंचनासाठी दोन तर पेयजलासाठी पाच आवर्तने देणे शक्य होईल. मात्र, आवर्तनाचे नियोजन हे वरिष्ठ पातळीवरून होत असते. मन्याडमधून सिंचनासाठी तीन आवर्तने दिली जातील. गिरणा धरणात सातत्याने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे हे धरणही ओव्हरफ्लो होऊ शकते.
- विजय जाधव, उपअभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, चाळीसगाव.

'मन्याड' ओव्हरफ्लो, १९ गावांमध्ये समाधान
गेल्यावर्षी मन्याडची एक्सप्रेस धीम्या गतीने धावत होती. धरण भरण्यासाठी २६ सप्टेंबर उजाडला होता. यंदा मात्र हे धरण ऑगस्टमध्येचं ओव्हरफ्लो झाले असून यातून सिंचनासाठी तीन आवर्तने दिली जाणार आहेत. पिलखोड, सायगाव, मांदुर्णे या गावांसह एकूण १९ गावांना या धरणाची धार जीवनदायिनी ठरते. पूर्ण वर्षात तीन आवर्तने सिंचनासाठी दिली जातील. याचा फायदा गुरांची चारा व पाणीटंचाई मिटण्यासाठीही होतो.

असा आहे लघु प्रकल्पांमधील जलसाठा
लघु प्रकल्पांपैकी वाधला-१ आणि वलठाण हे दोन प्रकल्प आठवडाभरापूर्वीच ओव्हरफ्लो झाले होते. हातगाव-१, राजदेहरे, कृष्णापुरी व कोदगाव या चार धरणांनी देखील शतक गाठले. खडकीसीम ३४.४९ टक्के, वाघला-७० टक्के, ब्राम्हण शेवगे ७१ टक्के, पिंपरखेड ५५ टक्के असा जलसाठा झाला आहे. तर कुंझर २. पिप्री उंबरहोळ, बोरखेडा, देवळी-भोरस व पथराड हे धरणे मात्र भर पावसाळ्यातही कोरडेच आहेत

Web Title: Latest news Nashik dam Storage 86 percent water storage in Girna Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.