Marathwada Vidarbha Rain Alert : मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा सरींची चाहूल. दक्षिण-पश्चिम मान्सून माघारी गेल्यानंतरही उत्तर-पूर्व मान्सूनच्या प्रभावामुळे येत्या काही दिवसांत वादळी वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Marathwada Vidarbha Rain Alert)
अकोला, बुलढाणा, वाशिम आणि बीड जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, शेतकऱ्यांना पिकांची काढणी आणि साठवणूक करताना काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Marathwada Vidarbha Rain Alert)
दक्षिण-पश्चिम मान्सून माघारी गेल्यानंतरही राज्यात पुन्हा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांच्या माहितीनुसार ३० ऑक्टोबरपर्यंत मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडणार आहेत. (Marathwada Vidarbha Rain Alert)
दरम्यान, विदर्भात २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडाहवामान अंदाज काय?
२५ ऑक्टोबर : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव
२६ ऑक्टोबर : नांदेड, लातूर, धाराशिव
२७ ऑक्टोबर : बीड
२८ ऑक्टोबर : नांदेड जिल्ह्यात
या काळात वादळी वारा (३०-४० किमी/ता), मेघगर्जना आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
३० ऑक्टोबरपर्यंत पाऊस सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी आणि किमान तापमान सरासरीएवढे ते किंचित जास्त राहील. तर ३१ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
विदर्भात यलो अलर्ट
दक्षिण-पश्चिम मान्सून परतल्यानंतर उत्तर-पूर्व (ईशान्य) मान्सूनच्या प्रभावामुळे विदर्भात अधूनमधून हलका पाऊस होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ ते २७ ऑक्टोबर या काळात अकोला, बुलढाणा, वाशिमसह पश्चिम विदर्भात यलो अलर्ट लागू असेल.
या काळात आकाश ढगाळ राहील, तापमानात किंचित घट होईल आणि आर्द्रतेत वाढ दिसून येईल. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन कापणीदरम्यान शेतकऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* हलक्या पावसाच्या शक्यतेमुळे काढणी केलेला माल सुरक्षित ठिकाणी साठवावा.
* कापूस वेचणी कोरड्या हवामानात करून साठवणूक करावी.
* रब्बी हंगामाच्या पेरणीपूर्वी बियाण्यास बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी.
* पावसाची शक्यता लक्षात घेऊन खतांची फवारणी व औषध वापर काळजीपूर्वक करावा.
उत्तर-पूर्व मान्सूनचा परिणाम म्हणून विदर्भात अधूनमधून हलका पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिकांच्या काढणी आणि साठवणीच्या कामात शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी. - डॉ. प्रवीण कुमार, ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ, प्रादेशिक हवामानशास्त्र विभाग.
