Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्याचे चित्र बदलणार? बजेटमध्ये नदीजोड प्रकल्पांसाठी हजारो कोटी

Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्याचे चित्र बदलणार? बजेटमध्ये नदीजोड प्रकल्पांसाठी हजारो कोटी

latest news Marathwada River Linking Project: Will Marathwada's thirst be quenched? Thousands of crores for river linking projects in the budget | Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्याचे चित्र बदलणार? बजेटमध्ये नदीजोड प्रकल्पांसाठी हजारो कोटी

Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्याचे चित्र बदलणार? बजेटमध्ये नदीजोड प्रकल्पांसाठी हजारो कोटी

Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नदीजोड प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. (Marathwada River Linking Project)

Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध नदीजोड प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली आहे. (Marathwada River Linking Project)

Marathwada River Linking Project : वैनगंगा-नळगंगा, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, नार-पार-गिरणा अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा बजेटमध्ये उल्लेख करण्यात आल्याने या बहुप्रतिक्षित योजनांना आता गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(Marathwada River Linking Project)

दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पश्चिम वाहिनी नद्यांच्या पुराचे पाणी देण्यासाठी विविध नदी जोड प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. (Marathwada River Linking Project)

या प्रकल्पांसाठी निधीची तरतूद अर्थसंकल्पात आजच्या करण्यात आली. हा निर्णय मराठवाड्यासाठी दिलासादायक आहे. बहुप्रतिक्षीत विविध नदी जोड प्रकल्पांना यामुळे गती मिळणार असल्याची प्रतिक्रिया जलतज्ज्ञांनी व्यक्त केली.(Marathwada River Linking Project)

वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पासाठी ९४ हजार ९६८ कोटी खर्च दाखवण्यात आला आहे. वैतरणा-उल्हास खात्यातील ५४ टीएमसी पाणी नदी जोड प्रकल्पाद्वारे मराठवाड्याला देण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे.(Marathwada River Linking Project)

दमणगंगा- वैतरणा-गोदावरी नदी जोड प्रकल्प, नार-पार- गिरणा नदी जोड प्रकल्प, दमणगंगा-एकदरे गोदावरी नदी जोड प्रकल्प आदी प्रकल्पांचा अर्थसंकल्पात उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी आवश्यक निधीचे आकडेही यात नमूद आहेत. त्यामुळे नदी जोड प्रकल्प राबविण्याबाबत गंभीर असल्याचे दिसते.(Marathwada River Linking Project)

मुख्यमंत्र्यांनी नदी जोड प्रकल्पाचे प्रस्ताव विधान भवनात मांडले. एवढे प्रकल्प मराठवाड्यात येताहेत. परंतु या प्रकल्पासाठी कार्यालय आणि कर्मचारी लागतील. दुसरीकडे येथील कार्यालये बंद करण्याचा घाट घातला जात आहे. हा विरोधाभास दूर करून कार्यालय बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा. डीपीआर तयार करण्याचे काम चालू आहे. हा डीपीआर मंजूर झाल्यानंतरच मराठवाड्याला न्याय मिळेल, असे म्हणता येईल.- डॉ. शंकरराव नागरे, अध्यक्ष, मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान

पश्चिम वाहिनी नद्यांचे १६८.७५ टीएमसी पाणी 

दुष्काळी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजित आहे. आजच्या बजेटमध्ये उल्हास-वैतरणा, नारपार व दमण गंगा नदीजोड प्रकल्पासाठी एकूण२२ हजार १७५ कोटींची तरतूद आहे. नदीजोड प्रकल्प, कृष्णा मराठवाडा प्रकल्प, अपूर्ण धरणे, कालवा दुरुस्ती, पूर्णा नदीवरील बंधारे, माजलगावकरिता असलेले लोणी, सावंगी बॅरेजेस, सिंचन अनुशेष याचा विचार करता ही तरतूद अपुरी वाटते.- नरहरी शिवपुरे, अध्यक्ष, मराठवाडा पाणी परिषद

हे ही वाचा सविस्तर : Wainganga Nalganga Project : विदर्भाची तहान भागणार! 'वैनगंगा-नळगंगा' प्रकल्पाला अखेर मंजुरी; जलक्रांतीची नवी पहाट

अधिक वाचा : Maharashtra Dam Water Storage : यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई टळणार? जाणून घ्या राज्यात किती पाणीसाठा उपलब्ध!

Web Title : मराठवाड़ा नदी जोड़ परियोजना: बजट आवंटन से उम्मीदें बढ़ीं

Web Summary : बजट आवंटन के साथ मराठवाड़ा की सूखाग्रस्तता कम हो सकती है क्योंकि नदी जोड़ परियोजनाओं को गति मिलती है। वैनगंगा-नलगंगा, दमन गंगा-गोदावरी जैसी परियोजनाओं का उल्लेख है। विशेषज्ञ समय पर डीपीआर अनुमोदन के महत्व पर प्रकाश डालते हैं।

Web Title : Marathwada River Linking Project: Hopes Rise with Budget Allocation

Web Summary : Marathwada's drought woes may ease as river linking projects gain momentum with budget allocation. Projects like Wainganga-Nalganga, Daman Ganga-Godavari are mentioned. Expert opinions highlight the importance of timely DPR approval for benefits.