Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > Marathwada Irrigation Project : मराठवाड्याच्या दुष्काळावर मोठा उपाय; ३ सिंचन प्रकल्पांनी बदलणार चित्र!

Marathwada Irrigation Project : मराठवाड्याच्या दुष्काळावर मोठा उपाय; ३ सिंचन प्रकल्पांनी बदलणार चित्र!

latest news Marathwada Irrigation Project: A big solution to the drought in Marathwada; 3 irrigation projects will change the picture! | Marathwada Irrigation Project : मराठवाड्याच्या दुष्काळावर मोठा उपाय; ३ सिंचन प्रकल्पांनी बदलणार चित्र!

Marathwada Irrigation Project : मराठवाड्याच्या दुष्काळावर मोठा उपाय; ३ सिंचन प्रकल्पांनी बदलणार चित्र!

Marathwada Irrigation Project : मराठवाड्यातील कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी ३ नव्या सिंचन प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात आला असून, तब्बल १२ हजार ४०० कोटींच्या या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेती आणि पेयजलाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.(Marathwada Irrigation Project)

Marathwada Irrigation Project : मराठवाड्यातील कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्यासाठी मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी ३ नव्या सिंचन प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यात आला असून, तब्बल १२ हजार ४०० कोटींच्या या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेती आणि पेयजलाचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटण्याची शक्यता आहे.(Marathwada Irrigation Project)

बापू सोळुंके

मराठवाड्यातील कायमस्वरूपी पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी तीन महत्त्वाकांक्षी सिंचन प्रकल्प प्रस्तावित करण्यात आले आहेत.(Marathwada Irrigation Project)

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या माध्यमातून हे प्रकल्प उभारले जाणार असून, प्रत्येक प्रकल्पाची क्षमता ५० दलघमी इतकी आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी एकूण सुमारे १२ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे.(Marathwada Irrigation Project)

मराठवाडा हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. गेल्या अनेक दशकांत फारच कमी वर्षांत समाधानकारक पाऊस पडला आहे.

परिणामी दरवर्षी अनेक गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागतो. २०१५-१६ मध्ये लातूर जिल्ह्यात निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईमुळे रेल्वेने पाणी आणण्याची वेळ आली होती.

या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने दीर्घकालीन उपाय म्हणून हे प्रकल्प हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नांदेड-अहमदपूर सिंचन प्रकल्प

या प्रकल्पाअंतर्गत गोदावरीनदीचे तेलंगणाकडे वाहून जाणारे सुमारे ५० दलघमी पाणी वंकेश्वर बंधाऱ्याजवळून पंपहाऊसच्या मदतीने उचलले जाणार आहे. हे पाणी सुमारे ८५ किलोमीटर अंतरावरील लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त अहमदपूर तालुक्यात नेले जाईल.

तेथे मोठ्या स्टोअरेज टँकची उभारणी करून पाणी पेयजल व सिंचनासाठी वापरले जाणार आहे. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ४,४०० कोटी रुपये आहे.

मुळी बंधारा ते मांजरा खोरे प्रकल्प (लातूर)

लातूर जिल्ह्यातील मांजरा नदीचे खोरे हे पाण्याच्या कमतरतेसाठी ओळखले जाते. या समस्येवर उपाय म्हणून नांदेड जिल्ह्यातील मुळी बंधाऱ्यातून ८५ किलोमीटर अंतरावर मांजरा खोऱ्यात ५० दलघमी पाणी आणले जाणार आहे.

या प्रकल्पामुळे सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होणार असून, शेतीला चालना मिळेल. या योजनेसाठी सुमारे ४ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नांदेड-लोहा सिंचन प्रकल्प

या प्रकल्पाद्वारे नांदेडमधील गोदावरी नदीचे वाहून जाणारे ५० दलघमी पाणी लोहा तालुक्यात नेले जाणार आहे. यासाठी सुमारे ८५ किलोमीटर लांबीची पाइपलाइन टाकली जाणार असून, पाणी पेयजल व सिंचनासाठी वापरले जाईल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे ४ हजार कोटी रुपये आहे.

पाणीटंचाईवर दीर्घकालीन उपाय

या तिन्ही प्रकल्पांमुळे नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांना मोठा दिलासा मिळणार आहे.

शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढल्याने उत्पादनात वाढ होईल, तर ग्रामीण भागातील पेयजल समस्या देखील मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

सिंचन सुविधा उपलब्ध झाल्याने पिकांचे उत्पादन वाढेल, पीकपद्धतीत बदल होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढण्यास मदत होईल. यामुळे मराठवाड्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी मिळण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यातील दीर्घकालीन पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रस्तावित हे तीन सिंचन प्रकल्प महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

योग्य अंमलबजावणी झाल्यास नांदेड व लातूर जिल्ह्यांचा पाणीप्रश्न मोठ्या प्रमाणात सुटू शकतो आणि शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडू शकतो.

हे ही वाचा सविस्तर : Vidarbha River Linking Project : 'वैनगंगा-नळगंगा' प्रकल्पात बदल; कामाला गती देण्यासाठी सरकारची नवी रणनीती

अधिक वाचा : Marathwada River Linking Project : दुष्काळी मराठवाड्याचे चित्र बदलणार? बजेटमध्ये नदीजोड प्रकल्पांसाठी हजारो कोटी

Web Title : मराठवाड़ा सिंचाई परियोजनाएँ: सूखा से निपटने और क्षेत्र को बदलने के लिए तीन परियोजनाएँ।

Web Summary : मराठवाड़ा में पानी की कमी को दूर करने के लिए नांदेड़ और लातूर में तीन सिंचाई परियोजनाएँ प्रस्तावित हैं। ₹12,400 करोड़ की लागत वाली इन परियोजनाओं का उद्देश्य प्रत्येक में 50 टीएमसी पानी का उपयोग करना, पेयजल और सिंचाई प्रदान करना, और सूखाग्रस्त क्षेत्र में कृषि और ग्रामीण अर्थव्यवस्था को बढ़ावा देना है।

Web Title : Marathwada Irrigation Projects: Three projects to combat drought and transform the region.

Web Summary : Three irrigation projects are planned for Nanded and Latur to address Marathwada's water scarcity. These projects, costing ₹12,400 crore, aim to utilize 50 TMC of water each, providing drinking water and irrigation, boosting agriculture and the rural economy in the drought-prone region.