Lokmat Agro >हवामान > Marathawada Water shortage: ऐन उन्हाळ्यात धरणांतील पाणीपातळी घसरली; जाणून घ्या सविस्तर

Marathawada Water shortage: ऐन उन्हाळ्यात धरणांतील पाणीपातळी घसरली; जाणून घ्या सविस्तर

latest news Marathawada Water shortage: Water level in dams drops in summer; Know the details | Marathawada Water shortage: ऐन उन्हाळ्यात धरणांतील पाणीपातळी घसरली; जाणून घ्या सविस्तर

Marathawada Water shortage: ऐन उन्हाळ्यात धरणांतील पाणीपातळी घसरली; जाणून घ्या सविस्तर

Marathawada Water shortage : कायम दुष्काळी प्रदेश असणाऱ्या मराठवाड्यात यंदाही उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांत फक्त ३२ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा (Dam Water) असून, लघुप्रकल्पांमध्ये ही पाणीपातळी केवळ २१ टक्क्यांवर पोहोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा दुप्पट असला तरी उन्हाळ्यातील मागणी आणि उन्हाची तीव्रता लक्षात घेता धरणांतील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होताना दिसत आहे. वाचा सविस्तर (Marathawada Water shortage)

शेअर :

Join us
Join usNext

छत्रपती संभाजीनगर :

कायम दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातील मोठ्या आणि मध्यम प्रकल्पांतील जलसाठा (Dam Water) सरासरी ३२ टक्क्यांच्या खाली आहे. लघुप्रकल्पांत तर केवळ २१ टक्केच पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली. (Marathawada Water shortage)

विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत मराठवाड्यातील यंदाचा जलसाठा (Dam Water) दुपटीने अधिक असल्याचे दिसून येते. मराठवाड्यावर कायम दुष्काळाचे सावट असते. (Marathawada Water shortage)

दोन वर्षापूर्वी मराठवाड्यात अत्यल्प पाऊस पडला होता. यामुळे मागील वर्षी मराठवाड्यातील लघू आणि मध्यम प्रकल्पांनी (Dam Water) तळ गाठला होता. गतवर्षी जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागात चांगला पाऊस पडला होता. 

शिवाय मराठवाड्यातही चांगला पाऊस झाला होता. यामुळे सर्वच लहान, मोठी धरणे ५० टक्क्यांवर भरली होती. परिणामी, यंदाच्या कडक उन्हाळ्यातही सर्वच धरणांमध्ये (Dam Water) गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट पाणीसाठा असल्याचे दिसून येते. (Marathawada Water shortage)

डाव्या कालव्यातून उन्हाळी आवर्तन सुरू

* जायकवाडी प्रकल्पाद्वारे मराठवाड्यातील जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.

* डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे पाण्याचे आवर्तन सोडून हे सिंचन करण्यात येते.

* डाव्या कालव्याद्वारे शेवटचे आणि उन्हाळी आवर्तन सध्या चालू असल्याचे लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य प्रशासक जयंत गवळी यांनी सांगितले.

असा आहे प्रकल्पातील पाणीसाठा

प्रकल्पाचा प्रकारधरणांची संख्याविद्यमान जलसाठा (%)गतवर्षीचा जलसाठा (%)
मोठे प्रकल्प४४३२%११%
मध्यम प्रकल्प८१३१%१७%
लघुप्रकल्प७२५२१%१२%

हे ही वाचा सविस्तर : Jayakawadi dam : सिंचनक्षेत्रात जलक्रांती: जायकवाडीचा उजवा कालवा आता होणार 'सुपरफास्ट' वाचा सविस्तर

Web Title: latest news Marathawada Water shortage: Water level in dams drops in summer; Know the details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.