Join us

Maharshtra Weather Update : पावसाचा जोर वाढणार की ओसरणार? काय सांगतो IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 13:28 IST

Maharshtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम असून, अरबी समुद्रातील सायक्लोनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation) आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. वाचा सविस्तर (Maharshtra Weather Update)

Maharshtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर अजूनही कायम असून, अरबी समुद्रातील सायक्लोनिक सर्क्युलेशन (Cyclonic Circulation)  आणि कमी दाबाचा पट्टा यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharshtra Weather Update)

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, नाशिक, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो व ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नाशिकसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे. (Maharshtra Weather Update)

अनेक नद्यांची पातळी वाढल्याने पूरस्थिती गंभीर झाली असून शेतकऱ्यांना खरीप पिकांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.(Maharshtra Weather Update)

हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार,  पुढील ४८ तास महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा धोका कायम राहणार आहे. शेतकरी व नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करून सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Maharshtra Weather Update)

हवामानाची स्थिती 

अरबी समुद्रात पुन्हा एकदा सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले असून सलग आठव्या दिवशी कमी दाबाचा पट्टा कायम आहे. यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांसाठी आज यलो अलर्ट, तर पुणे घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले असून, आज पहाटेपासूनही पावसाने जोर धरल्याने वाहतूक व जनजीवन विस्कळीत झाले आहे.

येथे अलर्ट जारी

यलो अलर्ट : पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, नाशिक घाट परिसर, सातारा घाट परिसर

ऑरेंज अलर्ट : पुणे घाट परिसर

मध्य महाराष्ट्र : तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कोकण : तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* भात पिकात निचऱ्यासाठी पाटबंधारे खुली ठेवावीत.

* सोयाबीन, मका, भुईमूग पिकात शेतात पाणी साचू देऊ नये याची दक्षता घ्यावी. 

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांनी घ्यावी 'ही' महत्त्वाची काळजी वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसकोकणविदर्भमराठवाडाधरणपाणीचक्रीवादळ