Join us

Maharshtra Weather Update : पोळा सण आणि पावसाचं समीकरण; कुठं यलो अलर्ट तर कुठं उन्हाची चाहूल वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 09:43 IST

Maharashtra Weather Update : मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. हवामान विभागाने पुढील २४ तासांसाठी काय दिलाय अंदाज वाचा सविस्तर (Maharshtra Weather Update)

Maharashtra Weather Update :  मुंबईत पावसाने थोडी विश्रांती घेतली असली तरी राज्यातील काही भागात अजूनही पावसाचा जोर कायम आहे. कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भीती आहे.(Maharshtra Weather Update)

ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात पावसाने दमदार हजेरी लावली असून गेल्या काही दिवसांत कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला.(Maharshtra Weather Update)

धरण क्षेत्रांमध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली.(Maharshtra Weather Update)

शिवाय, समुद्रातील प्रचंड लाटा आणि धडकी भरवणारा उधाण नागरिकांच्या चिंतेत भर घालत आहे. मात्र, मागील २४ तासांमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरल्याने दिलासा मिळाला आहे.(Maharshtra Weather Update)

मुंबईत पावसाचा ब्रेक

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडून जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, आता पावसाने विश्रांती घेतली आहे. शहरात वातावरण ढगाळ असून पश्चिम उपनगरे आणि नवी मुंबईत अधूनमधून सरी बरसत आहेत. पाऊस नेमका केव्हा कोसळेल याबाबत अनिश्चितता असल्याने नागरिक आता येतो की नंतर? अशा संभ्रमात आहेत.

पुढील २४ तासांचा पावसाचा अंदाज

IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील २४ तासांत राज्यात मिश्र परिस्थिती राहणार आहे. कुठे यलो अलर्ट करण्यात आला तर कुठे पावसाचा वेग कमी होताना दिसणार आहे.

कोकण आणि घाटमाथा परिसरात रायगड, रत्नागिरी, सातारा (घाटमाथा) आणि पुणे (घाटमाथा) येथे जोरदार सरींची शक्यता. यासाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने पूरस्थितीची भीती कायम आहे.

मराठवाड्यातील हिंगोली, जालना आणि परभणी जिल्ह्यांत हलक्या सरींची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वाशिम वगळता इतर जिल्ह्यांत पावसाचा कोणताही इशारा नाही.

दक्षिण मध्य महाराष्ट्रत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडतील.

उत्तर मध्य महाराष्ट्रातील दुर्गम भागांमध्ये तुरळक ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

पूरस्थितीची भीती कायम

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील नद्या धोक्याच्या पातळी ओलांडताना दिसत असल्याने काही गावांमध्ये पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.

कोकणातील नदीकाठच्या गावांमध्ये धरणातून पाण्याचा विसर्ग झाल्याने आधीच नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले आहे. प्रशासन सतर्क असून मदतकार्य सज्ज ठेवण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* पोळ्याच्या निमित्तानं बैलांची सजावट करताना त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

* पावसाळ्यात चिखल व ओलसरपणामुळे जनावरांना पायाचे आजार होऊ शकतात; म्हणून स्वच्छ, कोरडे ठिकाण ठेवा.

* पशुखाद्य कोरड्या व सुरक्षित जागी साठवा.

हे ही वाचा सविस्तर :Maharshtra Weather Update : पावसाचा जोर वाढणार की ओसरणार? काय सांगतो IMD रिपोर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसशेतकरीशेतीकोकणविदर्भमराठवाडामुंबईमहाराष्ट्र