Maharashtra weather update : राज्यातील तापमानात लक्षणीय घसरण झाल्याने पुन्हा एकदा थंडीची लाट जाणवत असून नागरिकांना हुडहुडी भरली आहे. मधल्या काही दिवसांत थंडीचा प्रभाव काहीसा कमी झाला होता, मात्र आता पुन्हा थंडी कायम राहणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.(Maharashtra weather update)
पुढील काही दिवसांत राज्यातील हवामानात मोठा बदल होणार नसून, काही भागांत विरळ धुक्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Maharashtra weather update)
पुढील ४८ तासांचा हवामान अंदाज काय?
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील कमाल तापमानात हळूहळू वाढ होईल, त्यानंतर त्यात फारसा बदल जाणवणार नाही.
तर किमान तापमानाबाबत सांगायचे झाल्यास, पुढील ४८ तासांत किमान तापमानात १ ते २ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून, त्यानंतरच्या ३ दिवसांत २ ते ३ अंशांनी वाढ होईल. दरम्यान, गुजरातमध्ये पुढील ३ दिवसांत किमान तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ, तर त्यानंतर पुन्हा घट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील किमान तापमान (गेल्या २४ तासांत)
मुंबई (सांताक्रूझ) : १७.४°C
मुंबई (कुलाबा) : २२.०°C
गोंदिया : ८.४°C
अहिल्यानगर : ८.५°C
यवतमाळ : ९.६°C
पुणे : १०.४°C
नागपूर : १०.०°C
नाशिक : ९.८°C
मालेगाव : ९.६°C
राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ८.४ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आहे.
राज्यातील विभागनिहाय हवामान कसे असेल?
* कोकणात हवामान कोरडे राहण्याची शक्यता
* मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता
* मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता
* विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता
थंडीचा परिणाम कायम
राज्यात थंडीचा प्रभाव अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता असून, पहाटेच्या वेळेत थंडी अधिक जाणवणार आहे. नागरिकांनी थंडीपासून काळजी घेण्याचे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* गहू, हरभरा, वाटाणा, कांदा, लसूण व इतर रब्बी पिकांमध्ये पहाटे दव व थंडीचा परिणाम दिसून येऊ शकतो. हलके पाणी देऊन पिकांवरील थंडीचा ताण कमी करता येईल.
* कापूस, सोयाबीनसारख्या काढणी झालेल्या पिकांची साठवण कोरड्या व हवेशीर ठिकाणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.
